लाच घेताना सहाय्यक आयुक्त अटकेत

By Admin | Updated: September 6, 2014 02:36 IST2014-09-06T02:36:08+5:302014-09-06T02:36:08+5:30

वसूली निरिक्षक परशुराम गायकवाड यांना गुरूवारी रात्री 11 वाजा प्लास्टिक व्यापा:याकडून 1 लाखाची लाच घेताना, लाच लुचपत प्रतिंबधक विभागाने रंगेहात अटक केली.

While accepting bribe, the assistant commissioner is arrested | लाच घेताना सहाय्यक आयुक्त अटकेत

लाच घेताना सहाय्यक आयुक्त अटकेत

सदानंद नाईक - उल्हासनगर
महापालिकेच्या एलबीटी विभागाचे सहाय्यक आयुक्त दीपक चिमणकारे यांच्यासह वसूली निरिक्षक परशुराम गायकवाड यांना गुरूवारी रात्री 11 वाजा प्लास्टिक व्यापा:याकडून 1 लाखाची लाच घेताना, लाच लुचपत प्रतिंबधक विभागाने रंगेहात अटक केली. 
   उल्हासनगर महापालिकेचा वादात असलेला एलबीटी विभागील अधिकारी व कर्मचारी यांच्यावर घोटाळे व भ्रष्टाचाराचे आरोप महासभेत झाले आहेत.गेल्या महासभेत या विभागाचे प्रमुख व अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर यांच्यावर टक्केवारीचा आरोप करून, यांच्या विरोधात कार्यमुक्तीचा ठराव आणला होता.  तसेच वादग्रस्त आठ कर्मचारी यांच्या बदलीचा व त्यांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी केली आहे.     एलबीटी विभागातील सहाय्यक आयुक्त व वाहन विभागाचे प्रमुख दीपक चिमणकारे, विभागाचे वसुली निरिक्षक परशुराम गायकवाड यांना गुरूवारी रात्री कॅम्प नं-2 मधील कपडा मार्केट मध्ये अनिल व सुनिल यांच्याकडे एलबीटीची चौकशी न करण्यासाठी 2 लाखाची मागणी केली होती. अखेर तोडजोडीत 1 लाख घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने दोघांना अटक केली. मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून न्यायालयाने त्यांना एक  दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे.

 

Web Title: While accepting bribe, the assistant commissioner is arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.