Join us

प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 06:07 IST

एप्रिल महिन्यात पूल बंद करून पाडण्यात येणार असल्याने तिकीट बुकिंग काउंटर स्थलांतरित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती; परंतु पुलाच्या पाडकामास विलंब झाल्याने हे कार्यालय स्थलांतरास स्थगिती देण्यात आली होती.

मुंबई : अटल सेतू आणि वरळी सी लिंक जोडणीसाठी प्रभादेवी येथील रेल्वे पूल शुक्रवारी मध्यरात्रीपासून बंद करण्यात आला. आता त्याच्या मध्यभागी असलेले पश्चिम रेल्वेचे तिकीट बुकिंग  कार्यालय स्थलांतर करण्याची तयारी रेल्वेकडून सुरू आहे.

येत्या २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करून त्याठिकाणी ते स्थलांतरित होईल, असे वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

एप्रिल महिन्यात पूल बंद करून पाडण्यात येणार असल्याने तिकीट बुकिंग काउंटर स्थलांतरित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती; परंतु पुलाच्या पाडकामास विलंब झाल्याने हे कार्यालय स्थलांतरास स्थगिती देण्यात आली होती.

आता ती पुन्हा सुरू करण्यात येणार आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, मध्य रेल्वेने मात्र त्यांचे तिकीट कार्यालय अगोदरच नवीन जागेच स्थलांतरित केले आहे.

हा पर्याय सोयीचा

प्रभादेवी येथील पूल सध्या पादचाऱ्यांसाठी सुरू असून ते मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या स्टेशनवर पोहोचतात. प्रभादेवी स्टेशनवर जाण्यासाठी तसेच तिकीट काढण्यासाठी पुलाच्या मध्य भागी असलेल्या तिकीट कार्यालयाचा पर्याय प्रवाशांसाठी सोयीस्कर ठरत होता. त्यामुळे तशीच एखादी जागा शोधण्याची सुरुवात असल्याचे अधिकारी म्हणाले.