उचललेला कचरा टाकायचा कुठे?
By Admin | Updated: November 8, 2014 01:20 IST2014-11-08T01:20:45+5:302014-11-08T01:20:45+5:30
केंद्राच्या आदेशानुसार पालिकेने मुंबईत स्वच्छता अभियान सुरू केले खरे, परंतु शहरात नाक्यानाक्यावर कच-याच्या डब्यांची कमतरता असल्याचे प्रकर्षाने जाणवू लागले आहे़

उचललेला कचरा टाकायचा कुठे?
मुंबई : केंद्राच्या आदेशानुसार पालिकेने मुंबईत स्वच्छता अभियान सुरू केले खरे, परंतु शहरात नाक्यानाक्यावर कच-याच्या डब्यांची कमतरता असल्याचे प्रकर्षाने जाणवू लागले आहे़ त्याचवेळी २० हजार कचऱ्याचे डबे घेण्याचा प्रस्ताव मात्र स्थायी समितीच्या पटलावर रेंगाळला आहे़ परिणामी स्वच्छतेच्या उद्दिष्टालाच हरताळ फासला जात आहे़
पालिकेने मुंबईच्या स्वच्छतेसाठी पंचवार्षिक योजना आखली आहे़ या योजनेनुसार सुरुवातीला पालिकेने आपल्या इमारती व आवारांची सफाई सुरू केली आहे़ मात्र कचऱ्याचे डबे कमी असल्याने साफ केलेला कचरा टाकायचा कुठे, असा प्रश्न पडला आहे़ कचऱ्याचे डबे खरेदी करण्याचा प्रस्ताव विधानसभा निवडणुकीच्या काळात रखडला तो आजतागायत़
ही बेपर्वाई लपविण्यासाठी अधिकारी निवडणुकीच्या आचारसंहितेचा अधार घेत आहेत़ मात्र कचऱ्याच्या डब्यांची खरेदी हा नियमित प्रस्ताव असल्याची कल्पना असताना अधिकाऱ्यांनी विलंब करून कचरा उचलण्याच्या कामात अडथळा आणल्याचा आरोप समाजवादीचे गटनेते रईस शेख यांनी स्थायी समिती अध्यक्षांना लिहिलेल्या पत्रातून केला आहे़ (प्रतिनिधी)