Join us

कोरोनापासून बचाव करण्यासाठी घर कुठे आहे? बेघरांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 03:14 IST

पदपथांवर राहणारी २५ हजार कुटुंबे, तसेच ५७ हजार ४१६ बेघर यांच्या सुरक्षेचे काय, असा सवाल सेंटर फॉर प्रमोटिंग डेमोक्रॅसीचे जगदीश पाटणकर यांनी केला आहे.

मुंबई : कोरोनाला थोपविण्यासाठी सरकार सर्व स्तरावर प्रयत्न करीत आहे. मात्र, पदपथांवर राहणारी २५ हजार कुटुंबे, तसेच ५७ हजार ४१६ बेघर यांच्या सुरक्षेचे काय, असा सवाल सेंटर फॉर प्रमोटिंग डेमोक्रॅसीचे जगदीश पाटणकर यांनी केला आहे. ज्यांच्याकडे घरच नाही, जे पदपथावर, रस्त्यावर बेघर म्हणून राहत आहेत, अशांनी कुठे राहावे? मुंबईत शहरी बेघरांकरिता १२५ निवारे बनविणे आवश्यक होते, पण मुंबई महानगरपालिका फक्त २३ निवारे चालवित आहे. परिणामी, यावर उपाययोजना करावी, असे म्हणणे पाटणकर यांनी मांडले आहे. 

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई