Join us

मुंबईमध्ये वृक्ष लागवड नेमकी होतेय तरी कुठे? चार वर्षांपासून २९ लाख झाडे कायम, अहवालात उघड

By सीमा महांगडे | Updated: August 29, 2025 12:14 IST

Mumbau News: मुंबईत २०२४-२५ या वर्षात पारंपरिक आणि मियावाकी पद्धतीने २० हजार ४४ वृक्ष लागवड करण्यात आली आहे. त्यामुळे एकूण वृक्षांची संख्या २९ लाख ७५ हजारांवर पोहोचल्याची माहिती महापालिकेने यंदाच्या पर्यावरण अहवालात दिली आहे.

- सीमा महांगडेमुंबईमुंबईत २०२४-२५ या वर्षात पारंपरिक आणि मियावाकी पद्धतीने २० हजार ४४ वृक्ष लागवड करण्यात आली आहे. त्यामुळे एकूण वृक्षांची संख्या २९ लाख ७५ हजारांवर पोहोचल्याची माहिती महापालिकेने यंदाच्या पर्यावरण अहवालात दिली आहे. मात्र, मागील चार वर्षापासून पालिकेच्या पर्यावरण अहवालातील प्रत्येक वॉर्डातील व एकूण वृक्षांची संख्या सारखीच असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पालिका नेमकी वृक्ष लागवड कुठे करते, असा प्रश्न पर्यावरणप्रेमींनी उपस्थित केला आहे.

मुंबईचा पर्यावरण स्थितीदर्शक अहवाल पालिकेने नुकताच सादर केला  आहे. २०२२-२३ सालाशी तुलना करता यंदा यात ९२ टक्क्यांनी घट झाल्याचे दिसून आले आहे. मात्र, पालिकेचा वृक्ष लागवडीचा दावा आणि प्रत्यक्ष झाडांची संख्या यामध्ये तफावत दिसून येत असल्याचे मत पर्यावरण तज्ज्ञांनी नोंदवले आहे. पालिकेच्या अहवालाऐवजी झाडांची प्रत्यक्ष मोजणी व सर्वेक्षण केल्यास पालिकेचे दावे खोटे असल्याचे उघडकीस येईल, असा दावा ते करत आहेत.

दर चार माणसांमागे एक झाडप्रत्येक माणसामागे किमान सहा झाडे, असा निकष अपेक्षित आहे परंतु, यंदाच्या मुंबईच्च लोकसंख्येच्या आकडेवारीच्या तुलने चार माणसांमागे केव एक झाड आहे, असे पर्यावरण अहवालात स्पष्ट झाले आहे.

विविध प्रकल्पांसाठी झाडे तोडली जातात. मात्र, ती पुनर्रोपित करण्याचा आणि पुनर्लागवडीचा दावा करण्यात येतो. प्रत्यक्षात यातील किती झाडे लावली जातात आणि किती जगतात, याची आकडेवारी पालिका कधीच स्पष्ट करत नाही. वर्षानुवर्षे त्याच आकड्यांच्या खेळावर पालिका नागरिकांची फसवणूक करत आहे.- रोहित जोशी, पर्यावरण अभ्यासक

वृक्षतोड करताना त्याची अधिकृत नोंदच ठेवली जात नाही. दक्षिण मुंबईसारख्या भागात प्रकल्पाच्या नावाखाली वृक्षतोड होऊन पर्यावरणाची हानी होत आहे. मात्र, प्रकल्प विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे.- डी. स्टॅलिन, पर्यावरण अभ्यासक

टॅग्स :मुंबई