‘त्या’ तिघी बहिणी गेल्या कुठे?

By Admin | Updated: July 3, 2016 01:59 IST2016-07-03T01:59:19+5:302016-07-03T01:59:19+5:30

घरात लग्नासाठी होत असलेल्या जबरदस्तीला कंटाळून मानखुर्दमधील तीन बहिणींनी घर सोडले आहे. मुलींचा शोध घेण्यासाठी मुंबईसह कर्नाटकमध्ये नातेवाईक आणि पोलीस रवाना झाले आहेत.

Where are the three sisters? | ‘त्या’ तिघी बहिणी गेल्या कुठे?

‘त्या’ तिघी बहिणी गेल्या कुठे?

मुंबई : घरात लग्नासाठी होत असलेल्या जबरदस्तीला कंटाळून मानखुर्दमधील तीन बहिणींनी घर सोडले आहे. मुलींचा शोध घेण्यासाठी मुंबईसह कर्नाटकमध्ये नातेवाईक आणि पोलीस रवाना झाले आहेत.
मानखुर्दमधील या तिघा बहिणींनी २६ जूनच्या रात्री घर सोडले होते. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहे. घटनेला सहा दिवस उलटूनही या मुलींचा थांगपत्ता लागलेला नाही. मुंबईसह कर्नाटकमध्ये पोलिसांनी शोध सुरू केला आहे. मूळचे कर्नाटक येथील गुलबर्गचे हे कुटुंब असल्याने नातेवाइकांसह पोलीस पथक तेथे रवाना झाले. तेथील नातेवाइकांकडेही चौकशी करण्यात येत आहे. तिन्हीही मुली गुलबर्गमध्ये असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Where are the three sisters?