Join us

'माझी नातवंडे कुठंय ? माझं संपूर्ण कुटुंब या घटनेत जखमी'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2023 09:32 IST

रहिवाशांनी सांगितली आपबिती

मुंबई: मी पूर्णपणे ठीक आहे. माझं संपूर्ण कुटुंब या घटनेत जखमी झाले आहे. माझी अडीच वर्षांची नात त्रिशा आणि तीन महिन्यांचा नातू मानवीक त्यांची तब्येत कशी आहे, असा सवाल जखमी गोकुळदास राठोड करत आहेत. त्यांना उपचारासाठी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

राठोड यांचा मुलगा सागर आणि ललिताबाई यांना उपचारासाठी ठाकरे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे. मात्र त्यांचा नातू आणि नात यांच्या पायावर भाजल्याच्या जखमा असल्यामुळे त्यांना प्राथमिक उपचार देऊन त्यांना पुढील उपचारासाठी कस्तुरबा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. त्यांच्यासोबत त्यांची आई कल्पना यांना सुद्धा याच रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. त्या सगळ्यांची प्रकृती स्थिर आहे.

रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, "या दोन्ही लहान मुलांच्या पायावर भाजल्याच्या जखमा होत्या.