Join us

गोयल यांच्या विरोधात उमेदवार मिळणार कधी?; गतनिवडणुकीत होती उर्मिला

By रेश्मा शिवडेकर | Updated: April 13, 2024 13:26 IST

उद्धवसेनेचे नेते विनोद घोसाळकर किंवा त्यांच्या स्नुषा तेजस्वी यांनी काँग्रेस कडून लढण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील आहे

रेश्मा शिवडेकर

मुंबई : केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर झाली. तेव्हापासून त्यांच्याविरोधात कोणाला उमेदवारी द्यायची, यावर विरोधकांचे एकमत झालेले नाही. भाजपचा गड समजल्या जाणाऱ्या या मतदारसंघात विरोधकांची अवस्था निर्णायकी झाली आहे.  संघटनेचा अभाव आणि भाजपशी दोन हात करेल असा तुल्यबळ उमेदवार नसल्याने उत्तर मुंबईतून लढण्यास काँग्रेस  इच्छुक नव्हती. तरी जागावाटपात काँग्रेसच्या वाट्याला हा मतदारसंघ आला आहे. 

उद्धवसेनेचे नेते विनोद घोसाळकर किंवा त्यांच्या स्नुषा तेजस्वी यांनी काँग्रेस कडून लढण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील आहे. परंतु, घोसाळकर यांनी उद्धव यांना सोडणार नाही अशी भूमिका घेतली आहे. 

 

 

 गुजराती, उत्तर भारतीयांच्या मतांबाबत खात्री असल्याने भाजपचा पहिल्या टप्प्यातील प्रचाराचा भर मागाठाणे, दहिसर, चोरकोप, गोराईवर अधिक आहे.  मनसे-सेनेच्या झगड्यात निरुपम जिंकून आले. अर्थात त्यावेळेस मोदी नावाचे गारूड मराठी जनमानसावर नव्हते. आता परिस्थिती निश्चितपणे बदलली आहे. इथली अनेक मध्यमवर्गीय मराठी कुटुंबांची सहानुभूती मोदींना आहे.

 भाजपच्या मागे ताकद लावण्याचे जाहीर केल्याने मनसेला पाठिंबा देणारे मुस्लिम मतदार दुखावलेत. ज्या ठिकाणी शाकाहार-मांसाहाराच्या विषयावरून मनसेच्या नेत्यांनी रान उठविले अशा भागातील नेत्यांनीही भाजपसोबत प्रचाराकरिता कसे उतरायचे असा प्रश्न पडला आहे. मध्यमवर्गीय मतदारांची मानसिकता लक्षात घेऊन भाजपचा प्रचाराचा भर स्थानिक प्रश्नांऐवजी मोदींच्या प्रतिमेवर जास्त आहे.

 

टॅग्स :उर्मिला मातोंडकरभाजपाशिवसेनापीयुष गोयल