Join us
Daily Top 2Weekly Top 5

...जेव्हा विद्याताई चव्हाण थांबवून रावतेंना जाब विचारतात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2018 12:45 IST

विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आणि सत्ताधारी आमने-सामने आले आहेत.

मुंबई- विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आणि सत्ताधारी आमने-सामने आले आहेत. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राष्ट्रवादीच्या आमदार विद्याताई चव्हाण यांनी शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावतेंना थांबवून ओला-उबर चालकांच्या प्रश्नाबाबत जाब विचारला आहे. दिवाळीची डेडलाइन उलटून गेल्यानंतरही अद्याप ओला, उबेर चालाकांच्या मागण्या मान्य झालेल्या नाहीत. त्यामुळे त्यांनी संप पुकारला आहे. या संपामुळे सर्वसामान्य ग्राहकांचे हाल होत असल्याचं सांगत विद्याताईंनी रावतेंना धारेवर धरले. त्यानंतर रावतेंनीही चिडून विद्याताईंना उत्तर दिलं. प्रवासासाठी लोकल, बस, मेट्रोसह इतर पर्याय उपलब्ध आहेत. हा वाद न्यायालयात असून, माझ्या हातात काहीही नाही, असं म्हणत रावते तिथून निघून गेले. सरकारनं ओला, उबर चालकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यानं मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील 30 हजार ओला, उबर टॅक्सीचालक आणि मालक संघटना संपावर गेल्या आहे. त्यामुळे प्रवाशांना याचा त्रास होत आहे. 

टॅग्स :विधानसभा हिवाळी अधिवेशन