Join us

पडझड कधी थांबणार?

By पुष्कर कुलकर्णी | Updated: March 2, 2025 11:47 IST

मुद्द्याची गोष्ट: सध्या शेअर बाजार अस्थिरतेचा सामना करीत आहेत. तसे पाहिले तर बाजाराने याआधीही खूप चढ-उतार बघितले आहेत. परकीय गुंतवणूकदारांनी भारतीय बाजाराशी केलेली कट्टी आणि ट्रम्पचे टेरिफ वॉर अशी काही तात्कालिक कारणे सध्याच्या घसरणीसाठी कारणीभूत असली, तरी घाबरून जाण्याची गरज नाही...

डॉ. पुष्कर कुलकर्णी, गुंतवणूक विश्लेषक

निफ्टी ५० आणि सेन्सेक्स त्यांच्या सप्टेंबर २०२४ या महिन्यातील उच्चतम पातळीवरुन खाली घसरले आहेत. गेले पाच महिने सलग इंडेक्स खाली येत असल्याने बाजाराने गुंतवणूकदारांना निराश केले आहे. यामुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यात जास्त भीती ही २०२४ मध्ये ज्यांनी बाजारात गुंतवणूक केली आहे त्यांना वाटत आहे. कारण त्यांचा पोर्टफोलिओ मोठ्या प्रमाणात खाली आला आहे.

गुंतवणूकदारांनी पॅनिक होऊ नये

शेअर बाजारात चढ उतार असणे हे नैसर्गिक आहे. बाजार जेव्हा जेव्हा खाली येतो तेव्हा तेव्हा भीतीचे वातावरण तयार होते. याला पॅनिक किव्वा फिअर फेज म्हणतात. अशा परिस्थितीत काही गुंतवणूकदार घाबरून नुकसान सहन करून बाहेर पडतात. परंतु जेव्हा जेव्हा पॅनिक परिस्थिती निर्माण होत असते तेव्हा तेव्हा बाजारात गुंतवणुकीची संधी असते हे अजिबात विसरू नये. खाली आलेला बाजार वर जाणार हे निश्चित.

घसरणीची कारणे

बाजार जेव्हा जेव्हा घसरला तेव्हा अनेक कारणे जबाबदार होती. सध्या बाजार का घसरला याची कारणे पाहूयात.

१. कोरोनानंतर बाजार एकतर्फी वाढला आहे.२. अनेक कंपन्यांच्या शेअर्सचे  व्हॅल्युएशन अवास्तव प्रमाणात वाढले होते.३. बाजार ओव्हरबॉट झोनमध्ये म्हणजेच उच्चतम खरेदी पातळीवर ट्रेड करीत होते.४. मोठ्या गुंतवणूकदारांनी याच काळात नफा वसुली केली.५. जागतिक पातळीवर अमेरिका येथील निवडणुकीनंतर ट्रम्प यांनी आंतराष्ट्रीय पातळीवर कडक धोरण अवलंबून टेरिफ वॉर सुरु केले. यामुळे अनेक देशांतील गुंतवणूकदार धास्तावले.६. परकीय गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून गेल्या  ५ वर्षांत ७ लाख ८० हजार कोटी रुपये काढून घेतले आहेत.७. भारतात लॉन्ग टर्म कॅपिटल गेन टॅक्समध्ये २.५% वाढ केल्याने परकीय गुंतवणूकदारांनी भारतीय बाजाराशी कट्टी केलेली दिसते.

यापूर्वी बाजाराने अनेक वेळा पाहिली मोठी घसरण 

एका महिन्याच्या टेक्निकल चार्टचा अभ्यास केला तर बाजाराने अशी घसरण यापूर्वी अनेक वेळा पाहिली आहे.

२५ वर्षांत निफ्टीने किती वाढ दिली?

बाजारातील घसरणीची टक्केवारी पहिली तर ती गुंतवणूकदारांना भीती दाखवणार किंवा घाबरवणार हे निश्चित आहे. परंतु जानेवारी २०००मध्ये निफ्टी ५० इंडेक्स केवळ १८०० होता आणि सप्टेंबर २०२४ मध्ये तो २६००० पार करून गेला. 

 

टॅग्स :शेअर बाजार