Join us  

दमलेला पोलीस बाबा जेव्हा घरी येतो...,मुलांच्या भावना पोलीस पत्नीने मांडल्या कवितेतून

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2020 3:37 PM

दादर पोलीस कॉलनीत राहणारे शिवराज म्हेत्रे हे डी.बी मार्ग पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरिक्षक म्हणून कार्यरत आहेच.

ठळक मुद्देघरी पत्नी १० वर्षाची मुलगी सई आणि ५ वर्षाचा मुलगा साईराज असे कुटुंब आहे. त्यांची पत्नी मिरा यांनी मुलांना दमलेल्या पोलीस बाबा विषयी वाटणारी भावना कवितेतून मांडली आहे.

मुंबई : कोरोनाच्या संकटात जीव धोक्यात घालून कार्यरत असलेला पोलीस बाबा घरी असला तरी एकटा असतो, त्यात मुलांना जवळ घेण्याचीही भीती. याच पोलीस बाबा विषयी वाटणारी भावना पोलीस पत्नीने कवितेतून मांडली आहे.        

दादर पोलीस कॉलनीत राहणारे शिवराज म्हेत्रे हे डी.बी मार्ग पोलीस ठाण्यात  सहाय्यक पोलीस निरिक्षक म्हणून कार्यरत आहेच. घरी पत्नी १० वर्षाची मुलगी सई आणि ५ वर्षाचा मुलगा साईराज असे कुटुंब आहे. कोरोनाचे हॉटस्पॉट असलेल्या मुंबईत कार्यरत पोलीस विविध प्रतिबंधित क्षेत्राबाहेर बंदोबस्ताला तैनात आहे. अशात आपल्यामुळे तो कुटुबियांला कोरोनाची बाधा होवू नये म्हणून स्वतःलाच कुटुबियांपासून लांब करत आहे.       

त्यांची पत्नी मिरा यांनी मुलांना दमलेल्या पोलीस बाबा विषयी वाटणारी भावना कवितेतून मांडली आहे. ही कविता सध्या सर्वत्र शेअर होत आहे. यातच घरी आले तरी मुलांना जवळ घेत नाही, कोरोना असेपर्यत लांब रहा असे सांगतो.  यात, 'दमलेला पोलीस बाबा जेव्हा घरी येतो, लगेच आम्ही त्याला मिठी मारायला जातो, तो म्हणतो लगेच नका लावू हात जोपर्यंत आहे कोरोनाची साथ" यासह पोलिसाला होणारा, त्रास, काळजी त्याची कर्तव्यनिष्ठा पाहून, पोलिसाची मुलगी असल्याचा अभिमान वाटत असल्याचेही यात नमूद करण्यात आले आहे. कवितेतून मांडलेले चित्र सध्या सर्वच पोलिसांच्या घरात आहे.मुलांची भावना बायकोच्या कुंचल्यातुनपोलिस बाबाची कहाणीदमलेला बाबा जेव्हा घरी येतोलगेच आम्ही त्याला मिठी मारायला जातोतो म्हणतो लगेच नका लावू हातजोपर्यंत आहे कोरोनाची साथमाझा बाबा किती दमून घरी येतोघरात पण तो एकटा एकटा राहतो सगळ्यांचे बाबा घरी पण माझा बाबा जातोवर्दीतला माणूस म्हणून काम करत राहतोत्यालापण वाटते ना रोज रोज भितीपण लोकांना समजून सांगणार तरी कितीऊन्हातानात तो रोज करतो कामत्यालाही येतो ना दमून घामना वेळेवर झोपतो ना वेळेवर जेवतोड्यूटी पुढे तो सगळे विसरतोसारखा असतो त्याच्या मनावर ताणपण कोणालाच नाही याचे भानकाही न मागताच तो सगळे काही देतोमनातलं सगळं तो वेळोवेळी जाणून घेतोमला माझ्या बाबाचा खूप अभिमान वाटतोखाकी वर्दी घालून जेव्हा थाटात तो चालतोकितीही संकटे आली तरीही बाबा माझा लढतोशूरपणा दाखवून तो वेळ प्रत्येक काढतोदेशरक्षणाचा त्याने घेतला आहे वसाम्हणून लोकांनो थोडे घरात बसादेवा हे कोरोना संकट लवकर कर दूरमला बाबाच्या कुशीत झोपायचयं भरपूरमी माझ्या बाबांची सतत काळजी घेईनत्याला जे हवं ते सगळे देईनएकच प्रार्थना करते देवा मी तुलाजन्मोजन्मी वर्दीतल्या पोलिसाची च मुलगी होऊ दे मलाअसाच पोलीस बाबा दे मला@ मिरा शिवराज म्हेत्रे, मुंबई

बलात्काराचा आरोपी जामिनावर तुरुंगातून बाहेर आला, पीडितेच्या घरी जाऊन केला चाकू हल्ला 

 

संतप्त तरुणीने महिला पोलिसाच्या हाताच्या दंडावर घेतला चावा अन् केली मारहाण 

टॅग्स :पोलिसकोरोना वायरस बातम्यामुंबई