Join us
Daily Top 2Weekly Top 5

अनपेक्षित भेट अविस्मरणीय आठवण ठरते तेव्हा...; राहुल कनाल यांचा दुबईतील हृदयस्पर्शी अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2026 11:22 IST

दुबईत अनेक भारतीय राहतात. काही जण पर्यटनासाठी जातात तर काही तरुण नोकरी - व्यवसायाच्या निमित्ताने तिथे स्थायिक झाले आहेत. त्यापैकीच एक तरुण राहुल कनाल यांना भेटला. त्यांचे काम, वेगवेगळे समाजोपयोगी उपक्रम याबाबत त्याला माहिती होती आणि त्याबद्दल आदरही होता. तो त्याच्या बोलण्यातून जाणवला. राहुल यांच्यासाठी ही मोठीच पोचपावती होती. 

एखादं काम, सामाजिक कार्य आपण निरपेक्षपणे आणि प्रामाणिक भावनेतून करत असतो, तेव्हा ते आपल्याही नकळत भौगोलिक सीमा ओलांडून सर्वदूर कसं पोहोचतं, ते आपली ओळख कशी बनतं आणि आपल्याला आदर कसा मिळवून देतं, याचा अनुभव राहुल एन. कनाल यांना अलीकडेच आला. आपल्या संस्थेच्या माध्यमातून विविध सेवाभावी उपक्रम राबवणारे राहुल कनाल दुबईला गेले असताना, एका चहाच्या स्टॉलवर एक अनपेक्षित अन् हृदयस्पर्शी प्रसंग घडला. दुबईत राहणाऱ्या एका भारतीय तरुणानं राहुल कनाल यांना ओळखलं, तो त्यांची भेट घ्यायला पुढे आला आणि 'हाय-हॅलो'ने सुरू झालेल्या गप्पा पुढे बराच वेळ रंगल्या. निघताना या तरुणाने त्यांच्यासोबत फोटो काढलाच, पण टी-शर्टवर त्यांची स्वाक्षरीही घेतली. ध्यानीमनी नसताना झालेली भेट एका अविस्मरणीय आठवणीत बदलली, अशी भावना राहुल कनाल यांनी व्यक्त केली.

दुबईत अनेक भारतीय राहतात. काही जण पर्यटनासाठी जातात तर काही तरुण नोकरी - व्यवसायाच्या निमित्ताने तिथे स्थायिक झाले आहेत. त्यापैकीच एक तरुण राहुल कनाल यांना भेटला. त्यांचे काम, वेगवेगळे समाजोपयोगी उपक्रम याबाबत त्याला माहिती होती आणि त्याबद्दल आदरही होता. तो त्याच्या बोलण्यातून जाणवला. राहुल यांच्यासाठी ही मोठीच पोचपावती होती. 

मुंबईत, महाराष्ट्रात आपण करत असलेलं काम यूएई पर्यंत पोहोचलं आहे, ही बाब निश्चितच समाधानाची होती. "जेव्हा तुम्ही करत असलेलं काम सीमेपलीकडील लोकांच्या जीवनाला स्पर्श करतं, तेव्हा असे क्षण खूप अर्थपूर्ण ठरतात. हे केवळ स्वाक्षरी किंवा फोटोपुरते मर्यादित नव्हते, तर मानवतावादी कार्यासाठी आणि सामाजिक कार्यासाठी स्वतःला वाहून घेणाऱ्या व्यक्तींबद्दल लोकांना वाटणाऱ्या भावनिक नात्याबद्दलही होते. असे प्रसंग आपल्याला आठवण करून देतात की, जगात तुम्ही कुठेही गेलात तरी समाजासाठी केलेले प्रामाणिक प्रयत्न नेहमीच लक्षात ठेवले जातात आणि त्याचे कौतुक केले जाते", असं भावनिक मनोगत राहुल कनाल यांनी व्यक्त केलं.


परदेशात राहणाऱ्या भारतीयांसाठी, लोकांच्या भल्यासाठी सक्रिय योगदान देणाऱ्या एखाद्या व्यक्तीला पाहून अनेकदा अभिमान, प्रेरणा आणि आपलेपणाची भावना निर्माण होते. यातून हेच सिद्ध होते की माणुसकी आणि सत्कार्य यांना कुठल्याही सीमेचे बंधन नसते.

English
हिंदी सारांश
Web Title : Rahul Kanal's Dubai encounter: Unexpected meeting creates unforgettable memory.

Web Summary : Rahul Kanal experienced an unexpected heartwarming encounter in Dubai. An Indian recognized Kanal for his social work, leading to a memorable meeting filled with respect and appreciation. Kanal felt touched that his work resonated internationally, proving humanity knows no borders.
टॅग्स :दुबई