सी-लिंकवरील आत्महत्या कशा रोखणार? -हायकोर्ट

By Admin | Updated: October 4, 2014 02:38 IST2014-10-04T02:38:33+5:302014-10-04T02:38:33+5:30

वांद्रे-वरळी सी-लिंकवरील आत्महत्या रोखण्यासाठी काय उपाययोजना केल्या आहेत किंवा केल्या जाणार आहेत, याचे प्रत्युत्तर सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहेत़

What will prevent c-link suicides? -haycourt | सी-लिंकवरील आत्महत्या कशा रोखणार? -हायकोर्ट

सी-लिंकवरील आत्महत्या कशा रोखणार? -हायकोर्ट

>मुंबई : वांद्रे-वरळी सी-लिंकवरील आत्महत्या रोखण्यासाठी काय उपाययोजना केल्या आहेत किंवा केल्या जाणार आहेत, याचे प्रत्युत्तर सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहेत़
या सेतूवरून समुद्रात उडी मारून आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढले आह़े तसेच हा सेतू दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर आह़े तेव्हा या सेतूच्या सुरक्षेसाठी न्यायालयाने एमएसआरडीसी व येथे टोलवसुली करणा:या कंपनीला योग्य ते आदेश द्यावेत, अशी जनहित याचिका केतन तिरोडकर यांनी दाखल केली आह़े
याचे प्रत्युत्तर सादर करताना कंपनीने या सेतूवर 8क् सीसीटीव्ही लावले जाणार असल्याची माहिती न्यायालयाला दिली़ तसेच गेल्या वर्षी 77 कोटी रुपये टोलवसुली झालेल्या या सेतूच्या सुरक्षेसाठी आतार्पयत 1क् कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत़ येथे 3क् सुरक्षारक्षक तैनात केले आहेत़ 6 जणांचे पथक बाईकवरून येथे गस्त घालत असत़े त्यामुळे कंपनीकडून या सेतूची संपूर्ण सुरक्षा केली जात़े पण या सूतेला कुंपण घालणो शक्य नसल्याचा दावा या कंपनीने प्रतिज्ञापत्रद्वारे केला़
एमएसआरडीसीने देखील स्वतंत्र प्रतिज्ञापत्र सादर करून या सेतूची सुरक्षा केली जात असल्याचे म्हटले आह़े गाडय़ांच्या तपासणीसाठी स्कॅनर मशिन लावणार होते,याला भारतात परवानगी नाही़ कारण या मशिनमध्ये चालकाचेही स्कॅन होत़े त्यामुळे येथे केवळ गाडी स्कॅन करणारी मशिन लावणार आहे, असे एमएसआरडीसीने प्रतिज्ञापत्रत नमूद केल़े सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रत्युत्तर न दिल्याने न्यायालयाने वरील आदेश दिले व ही सुनावणी दोन आठवडय़ांसाठी तहकूब केली़  (प्रतिनिधी)
 
च्या सेतूवर 8क् सीसीटीव्ही लावले जाणार असल्याची माहिती न्यायालयाला दिली़.
च्या सेतूच्या सुरक्षेसाठी आतार्पयत 1क् कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत़

Web Title: What will prevent c-link suicides? -haycourt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.