मुंबई : मुंबई महापालिकेने कोस्टल रोड प्रकल्पात भराव टाकून उपलब्ध झालेल्या ७० हेक्टर खुल्या जागेचा विस्तीर्ण हरित पट्टयात विकास करण्याचा आराखडा जाहीर केला आहे. यामध्ये पिकल बॉल कोर्ट, विस्तीर्ण पक्षी मार्ग, मियावाकी वने आणि विविध नागरी सुविधा उभारल्या जाणार आहेत. मुंबईतील झपाट्याने कमी होणाऱ्या हरित क्षेत्राची भरपाई यामार्फत केली जाणार असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.
साऊथ मुंबई रेसिडेंट असोसिएशनच्या वपतीने आयोजित नागरी संवादात पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी हा आराखडा सादर केला. कोस्टल रोड प्रकल्पासाठी समुद्राची १११ हेक्टर जमीनीवर भराव टाकण्यात आला.
त्यापैकी ४० हेक्टर क्षेत्र रस्ते, उड्डाणपूल व वाहतूक इंटरचेंजसाठी वापरण्यात आले असून, उर्वरित ७० हेक्टर जमीन उद्याने व खुल्या नागरी सुविधांसाठी राखीव आहे. या जागेवर सुशोभीकरण प्रकल्पासाठी पालिकेकडून सीएसआरअंतर्गत रिलायन्सची नियुक्ती केली असून, सुमारे ४०० कोटी खर्च करण्यात येणार आहेत.
या जमिनीवर लैंडस्केपिंग आणि त्याच्या देखभालीचा कालावधी हा पुढील ३० वर्षांचा असणार आहे. याअंतर्गत भुलाभाई देसाई रोडजवळील बाहेर पडणाऱ्या मार्गालगत 'बर्ड ट्रेल' विकसित केला जाणार आहे. अमरसन्स गार्डन इंटरचेंज परिसरात खुला रंगमंच आणि पाम वृक्षांनी सजलेला निसर्गमार्ग उभारला जाणार आहे.
वरळी ते महालक्ष्मीदरम्यान काय होणार?
हाजी अली इंटरचेंज परिसरात पिकल बॉल कोर्ट १ उभारण्याचा पालिकेचा विचार आहे. त्याचसोबत वरळी ते महालक्ष्मी दरम्यान मियावाकी पद्धतीची सूक्ष्म वने आणि 'कॉनफ्लुअन्स गार्डन्स' विकसित करण्यात येणार आहेत.
वरळी येथील निष्क्रिय जेट्टीचे कायमस्वरूपी हेलिपॅडमध्ये रूपांतर करण्याचाही प्रस्ताव असून, त्यासंबंधित प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आयुक्तांनी दिली. या सुशोभीकरणाचा अंतिम आराखडा हा उद्यान विभागाकडे यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडे सादर करण्यात आला असून, त्यांच्या अंतिम मंजुरीनंतर कामाला सुरुवात होणार आहे. या प्रकल्पासाठी जवळपास ३ वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.
रेसकोर्सवर वनस्पती उद्यान व क्रीडा सुविधा
महालक्ष्मी रेसकोर्सच्या २११ एकर जागेपैकी १२० एकर क्षेत्र महापालिकेकडे आले असून, या भागात वनस्पती उद्यान, टोपियरी गार्डन आणि 'सिटी फॉरेस्ट' विकसित करण्याचा प्रस्ताव पालिकेकडून करण्यात आला आहे. या शिवाय रेसकोर्स परिसरात भूमिगत क्रीडा सुविधा व कन्व्हेन्शन सेंटर उभारण्याची योजना आहे.
नेहरू सेंटर आणि आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानकांना जोडणारे भूमिगत बोगदे उभारून नागरिकांना थेट बाग परिसरात प्रवेश देण्याचा प्रस्ताव आहे. तसेच, हाजी अली गार्डनपर्यंत सलग हिरवा पट्टा निर्माण करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने व्यक्त केले आहे.
Web Summary : Mumbai's Coastal Road project will feature 70 hectares of green space with bird trails, Miyawaki forests, and citizen amenities. Reliance will handle landscaping, costing ₹400 crore. Mahalaxmi Racecourse will gain a botanical garden and sports facilities.
Web Summary : मुंबई तटीय सड़क परियोजना में पक्षी मार्ग, मियावाकी वन और नागरिक सुविधाओं के साथ 70 हेक्टेयर हरित क्षेत्र होगा। रिलायंस ₹400 करोड़ की लागत से भूदृश्य का काम संभालेगा। महालक्ष्मी रेसकोर्स में एक वनस्पति उद्यान और खेल सुविधाएँ होंगी।