सावत्र भावासोबत प्रेम केल्याची मोजली किंमत ?

By Admin | Updated: August 27, 2015 01:53 IST2015-08-27T01:53:05+5:302015-08-27T01:53:05+5:30

शीना बोहरा हत्येबाबत अनेक तर्कवितर्क सध्या सुरू आहेत. शीना आणि राहुल मुखर्जी यांच्यातील प्रेमसंबंध हा त्यापैकीच एक. शीना ही इंद्राणी व तिचे पहिले पती सिद्धार्थ दास यांची मुलगी होती.

What is the price of love with the half-brother? | सावत्र भावासोबत प्रेम केल्याची मोजली किंमत ?

सावत्र भावासोबत प्रेम केल्याची मोजली किंमत ?

मुंबई : शीना बोहरा हत्येबाबत अनेक तर्कवितर्क सध्या सुरू आहेत. शीना आणि राहुल मुखर्जी यांच्यातील प्रेमसंबंध हा त्यापैकीच एक. शीना ही इंद्राणी व तिचे पहिले पती सिद्धार्थ दास यांची मुलगी होती. तर राहुल हा इंद्राणीचे तिसरे पती पीटर मुखर्जी यांचा त्यांच्या पहिल्या पत्नीपासून झालेला मुलगा होता. २००२मध्ये पीटर आणि इंद्राणी यांनी विवाह केला. त्यानंतर शीना जसजशी मोठी होऊ लागली तसतशी इंद्राणीने ही माझी बहीण अशी सर्वांशी ओळख करून देऊ लागली. त्यामुळे इंद्राणी व शीना या बहिणी असल्याचेच आजतागायत बहुतांश लोकांना माहीत होते. दरम्यान, हत्येच्या काही काळाआधी शीना व राहुल यांच्यात प्रेमसंबंध सुरू झाले. त्यामुळे ही बाब इंद्राणी व पीटर या दोघांना खटकत होती. शीनाची हत्या झाल्याची माहिती काल मंगळवारी खार पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर पुढे आली. आज बुधवारी या प्रकरणाबाबत पीटर यांनी यांनी आपली बाजू माध्यमांसमोर मांडली. शीना ही इंद्राणीची बहीण होती हे मला आज समजले. आतापर्यंत मी तिला इंद्राणीची मुलगीच समजत होतो. मीच तिला मुंबईच्या सेंट झेवीअर महाविद्यालयात प्रवेश मिळवण्यासाठी मदत केली होती. इंद्राणीने वेळोवेळी दिलेल्या माहितीनुसार शीना गेल्या तीन वर्षांपासून परदेशात शिक्षण घेते आहे, असे मला वाटत होते. मी फेसबुकवर नाही, पण इंद्राणी अधूनमधून मला शीनाचे परदेशातील फोटो दाखवी. मीही त्यावर विश्वास ठेवला.
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार आॅनर किलिंगच्या दृष्टिकोनातूनही तपास करीत आहोत.
राहुलचा जबाब नोंदविला
यासर्व घडामोडींमध्ये राहुल आता महत्वाचा साक्षीदार म्हणून आता समोर येत आहे. पोलिसांनी आज त्याचा जबाब नोंदवून घेतला आहे. ज्यावेळेस शीना गायब झाली त्यावेळेस शंका येऊन राहुलने तिच्याबाबत इंद्राणीकडे त्याबाबत चौकशीही केली होती. इंद्राणीने त्यावेळेस शीना अमेरिकेत गेल्याचे सांगितले होते. मात्र समाधान न झाल्याने राहुल पोलिसांकडे ही गेला होता, मात्र शीनाबाबत अपुरी माहिती असल्यामुळे पुढे काहीच करू शकला नाही.

इंद्राणीची फॅमिली ट्री..
इंद्राणीचा पहिला विवाह गुवाहाटीत चहाच्या मळ्यांचे मोठे व्यावसायिक असलेल्या सिद्धार्थ दास यांच्यासोबत झाला. या दाम्पत्याला शीना व मिखाईल अशी दोन अपत्ये झाली.
दास यांना घटस्फोट दिल्यानंतर इंद्राणीने संजीव खन्ना यांच्याशी लग्न केले. इंद्राणीला खन्नांपासून एक मुलगी आहे. विधी असे तिचे नाव असून, सध्या ती लंडनमध्ये असते.
खन्ना यांना घटस्फोट दिल्यानंतर इंद्राणी व पीटर मुखर्जी यांनी विवाह केला.
इंद्राणी ही पीटर यांची दुसरी पत्नी आहे. त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव शबनम आहे. पीटर व शबनम यांना रॉबीन व राहुल अशी दोन अपत्ये आहेत.

मलाही भाऊ म्हणून वागवले
इंद्राणी म्हणजेच आईने शीनासोबत मलाही भावासारखेच वागवले. सर्वांना माझी ओळख धाकटा भाऊ म्हणून करून दिली, असा आरोप मिखाईल दास याने केला.
मिखाईल हा इंद्राणी व सिद्धार्थ दास यांचा मुलगा आहे. त्याने केलेल्या आरोपांनुसार शीना व मला बऱ्याच वर्षांनी इंद्राणी ही आमची आई आहे, हे समजले. आम्हा दोघांचे संगोपन आमच्या आजी-आजोबांनीच केले.

शीनाच्या मृतदेहाचे फक्त फोटोच
मे २०१२मध्ये पेण पोलिसांना खोपोली मार्गावरील गागोदे गावातील जंगलात शीनाचा मृतदेह सापडला होता. मात्र तो ७० टक्के भाजला होता. पोलिसांनी काही दिवसांनी या मृतदेहाची विल्हेवाट लावली. आताच्या घडीला मृतदेहाच्या ४ फोटोंव्यतिरिक्त पोलिसांच्या हाती काहीही नाही. त्यामुळे तो मृतदेह शीनाचाच होता, हे न्यायालयाला पुराव्यांनीशी पटवून देण्यात मुंबई पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागेल.

तज्ज्ञांकडे नमुने नाहीत
मुंबई न्यायवैद्यक प्रयोगशाळेतील उच्चपदस्थ सूत्रांनी लोकमतला दिलेल्या माहितीनुसार अद्याप खार पोलिसांनी या हत्येशी संबंधित एकही नमुना तपासणीसाठी धाडलेला नाही.

शीनाची हत्या झाल्याची माहिती काल मंगळवारी खार पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर पुढे आली. आज बुधवारी या प्रकरणाबाबत पीटर यांनी आपली बाजू माध्यमांसमोर मांडली.

Web Title: What is the price of love with the half-brother?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.