जागा देता का जागा?
By Admin | Updated: July 7, 2014 23:30 IST2014-07-07T23:30:40+5:302014-07-07T23:30:40+5:30
नागरिकांचा विरोध व लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे शहरात श्वान नियंत्रण केंद्राचा प्रश्न रखडला आहे.

जागा देता का जागा?
नामदेव मोरे - नवी मुंबई
नागरिकांचा विरोध व लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे शहरात श्वान नियंत्रण केंद्राचा प्रश्न रखडला आहे. विरोध झाल्याने मागील चार वर्षात चार ठिकाणचे प्रस्ताव रद्द करावे लागले आहेत. यामुळे निर्बीजीकरण केंद्र करायचे कोठे व कधी, असा प्रश्न पालिकेसमोर निर्माण झाला आहे.
नवी मुंबईमधील रस्त्यावर भटक्या कुत्र्यांची दहशत निर्माण झाली आहे. रात्री रोडवरून चालणोही मुश्कील होवू लागले आहे. कुत्रे पाठीमागे लागल्यामुळे मोटारसायकलचे अपघात झाल्याच्या घटनाही होवू लागल्या आहेत. शहरात 3क् हजार पेक्षा जास्त कुत्री असून रोज 3क् ते 35 जणांना श्वानदंश झाल्याच्या घटना होत आहेत. महानगरपालिकेच्यावतीने श्वान निर्बीजीकरणाचा कार्यक्रम राबविला जात आहे. शहरातील संख्या पाहता प्रत्येक महिन्याला किमान 25क्क् शस्त्रक्रिया होणो आवश्यक आहे. परंतु नवी मुंबईमध्ये निर्बीजीकरणासाठी पुरेशी जागाच नसल्यामुळे महिन्याला सरासरी 4क्क् ते 5क्क् शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. जागा नसल्यामुळे नवीन केंद्र उभारण्याचा प्रस्ताव रखडला आहे. पूर्वी कोपरी नाक्यावर महापालिकेने केंद्र सुरू केले होते. परंतु ती इमारत धोकादायक झाल्यामुळे केंद्र बंद करावे लागले आहे. आता सद्यस्थितीमध्ये डंपिंग ग्राऊंडवर तात्पुरत्या स्वरूपात केंद्र सुरू केले आहे.
महापालिकेने ऑगस्ट 2क्1क् मध्ये कोपरीचे केंद्र बंद केले. यानंतर तुर्भे पुलाखाली नवीन केंद्र उभारले जाणार होते. त्यासाठीचा प्रस्ताव मंजूर झाला होता. परंतु नागरिकांच्या विरोधामुळे ते बंद करावे लागले. यानंतर सीबीडीमध्ये पुलाखाली हे केंद्र होणार होते. परंतु विरोधामुळे तेही बारगळले. सिडकोने सानपाडय़ामध्ये पशुवैद्यकीय दवाखान्यासाठी भूखंड दिल्यानंतर त्या ठिकाणी पुरेशा क्षमतेचे निर्बीजीकरण केंद्र सुरू होणार होते. परंतु नागरिकांनी व नगरसेवकांनी त्यासही विरोध केल्यामुळे हा प्रस्तावही बारगळला आहे. भटक्या कुत्र्यांच्या त्रसामुळे नागरिक लोकप्रतिनिधींना दोष देतात व दुसरीकडे नवीन केंद्रही होवू दिले जात नाही. यामुळे काम कसे करायचे असा प्रश्न उभा राहिला आहे. कोणी जागा देता का जागा, असे बोलण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.
67 हजार नागरिकांना श्वानदंश
नवी मुंबईमध्ये 2क्क्8 पासून तब्बल 67 हजार 59 नागरिकांना श्वानदंश झाला आहे. शहरात रोज 3क् ते 35 जणांना श्वानदंश होत आहे. उपचार व निर्बीजीकरणावर महापालिका लाखो रूपये खर्च करत आहे. परंतु जोर्पयत महिन्याला किमान 25क्क् शस्त्रक्रिया होणार नाहीत तोर्पयत कुत्र्यांची संख्या नियंत्रणात येवू शकत नाही असे अधिका:यांचे मत आहे. नागरिकांच्या हितासाठी शक्य तितक्या लवकर नवीन केंद्राचा प्रश्न मार्गी लागणो आवश्यक आहे.
वर्षश्वानदंश
2008 -97816
2009 -1क्9671
201क् - 1110935
2011 -1212774
2012 -1313435
2013 -1412428