- ॲड. (डॉ.) प्रशांत माळी(सायबर कायदा तज्ज्ञ, उच्च न्यायालय)मुंबई : सैफ अली सारखी प्रकरणं झाली की, सामान्य माणसांना काही नवीन शिकवण देऊन जातात. ड्रम डेटा आणि कॉल डेटा रेकॉर्ड्स (सीडीआर) या दोन महत्त्वाच्या तांत्रिक पुराव्यांचा उपयोग या केसच्या तपासात झाल्याचे काही अधिकारी सांगत आहेत. या दोन गाेष्टी तपासात नेमकी कोणती भूमिका बजावतात?काही आरोपींना ताब्यात घेण्यासाठी झाला आहे. या प्रकारची तांत्रिक तपासणी डिटेक्शनमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते.
ड्रम डेटा म्हणजे?ड्रम डेटा म्हणजे ‘डिटेल्ड रेडिओ युसेज मॅपिंग’ डेटा. हा डेटा मोबाइल टॉवर्सकडून संकलित होतो आणि वापरकर्त्यांच्या मोबाइल फोनचे स्थान, वेळ आणि रेडिओ फ्रिक्वेन्सी वापर दर्शवतो. साधारणतः ड्रम डेटा वापरून, विशिष्ट ठिकाणी कोणत्या मोबाइल डिव्हाइसचे सिग्नल्स उपस्थित होते, याचा मागोवा घेतला जातो. यामुळे एखादा संशयित व्यक्ती गुन्ह्याच्या ठिकाणी होता का, हे शोधणे शक्य होते.
‘सीडीआर’ म्हणजे ?सीडीआर म्हणजे कॉल डेटा रेकॉर्ड्स. यामध्ये मोबाइल नंबरवरून केलेले किंवा आलेले कॉल्स, त्यांची वेळ, कालावधी, लोकेशन, आणि कधी कधी एसएमएस डेटा यांचा समावेश होतो. हे रेकॉर्ड्स संबंधित टेलिकॉम ऑपरेटर्सकडून उपलब्ध होतात आणि त्यांचा वापर सायबर आणि अन्य गुन्हेगारी प्रकरणांमध्ये केला जातो.
तपासणी कशी होते?गुन्ह्याच्या ठिकाणी कोणती डिव्हाइसेस सक्रिय होती, हे ड्रम डेटाच्या मदतीने शोधले जाते. यामुळे संशयितांच्या हालचालीचा मागोवा घेता येतो.संशयित व्यक्तींनी कुणाशी संवाद साधला, कोणते कॉल्स, संदेश पाठवले, याचा अभ्यास केला जातो. वेळ, स्थान यांचा ताळमेळ तपासून, गुन्ह्यातील संबंध जोडले जातात.यांच्या मदतीने तांत्रिक पुरावे गोळा करता येतात. ते न्यायालयीन तपासणीत कामी येतात. सैफ अली प्रकरणातही याच पद्धतीने आरोपींची ओळख पटविण्यात येत आहे. सत्य समोर आणण्यासाठी आधुनिक पोलिस तपासाचे एक महत्त्वाचे अंग झाले आहे.