Join us
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेची प्रभाग समिती म्हणजे काय? काम कोणते? जाणून घ्या प्रभाग समितीचं महत्त्व...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2026 15:27 IST

संविधानाच्या ७४ व्या घटनादुरुस्तीनुसार महापालिका प्रशासनाचा कारभार अधिक लोकाभिमुख व सक्षम करण्यासाठी मुंबई महानगरपालिका अधिनियम, १९८८ मध्ये कलम ५० अंतर्गत सुधारणा करुन सत्तेचे विकेंद्रीकरण करण्यात आले.

संविधानाच्या ७४ व्या घटनादुरुस्तीनुसार महापालिका प्रशासनाचा कारभार अधिक लोकाभिमुख व सक्षम करण्यासाठी मुंबई महानगरपालिका अधिनियम, १९८८ मध्ये कलम ५० अंतर्गत सुधारणा करुन सत्तेचे विकेंद्रीकरण करण्यात आले. या तरतुदीनुसार शहरात स्थानिक पातळीवर निर्णयप्रक्रिया प्रभावीपणे चालावी म्हणून प्रभाग समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. 

प्रभाग समितीत कुणाकुणाचा समावेश?- मुंबईतील ठरावीक विभागांची मिळून एक प्रभाग समिती तयार केली जाते. - प्रत्येक प्रभाग समितीत त्या भागातील सर्व नगरसेवक (सध्या सदस्य) समाविष्ट असतात. - सदस्यांमधून अध्यक्षाची निवड केली जाते. - संबंधित विभागाचा सहायक आयुक्त हा प्रशासकीय प्रमुख असतो. - अभियंते, आरोग्य अधिकारी, स्वच्छता अधिकारी, आदी अधिकारी बैठकीत सहभागी होतात. - लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांचा समन्वय साधला जातो. - प्रभाग समितीचा हा कार्यकाळ हा पालिकेच्या कार्यकाळाइतकाच असतो. - स्थानिक पातळीवर निर्णयप्रक्रिया गतिमान करण्यासाठी आणि नागरिकांच्या दैनंदिन गरजांवर तातडीने उपाययोजना करण्यासाठी महत्त्वाची यंत्रणा म्हणून प्रभाग समित्या काम करत असतात. 

मुंबई महानगरपालिकेत १८ प्रभाग समित्या कार्यरत१. मुंबईत सध्या १८ प्रभाग समित्या असून ज्या प्रभागात ज्या पक्षाचे जास्त नगरसेवक असतील, त्या पक्षाच्या नगरसेवकाची अध्यक्ष म्हणून निवड केली जाते. 

२. मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपचे ८९, तर शिंदेसेनेचे २९ नगरसेवक निवडून आले आहेत. उद्धवसेनेचे ६५, तर काँग्रेसचे २४ नगरसेवक आहेत. 

प्रभाग समिती प्रामुख्याने कोणत्या सूचना करते?- रस्ते व चौक यांचे नामकरण व नावात बदल करण्यासंबंधातील सूचना- प्रत्येक नगरसेवकाच्या मतदारसंघातील, अनपेक्षित कामांकरिता असलेल्या तरतुदीमधून (नगरसेवक निधी) करावयाची कामे, अर्थसंकल्पीय तरतुदीची कामे. - स्वच्छता राखण्यासंबंधातील सूचना/प्रस्ताव.- मंड्यांच्या दुरुस्तीसंबंधातील सूचना/प्रस्ताव- शालेय इमारती व पालिकेच्या इतर इमारती इत्यादींची दुरुस्तच्या सूचना/प्रस्ताव- उद्यानांचा विकास व त्यांचे परिरक्षण या संबंधातील सूचना/प्रस्ताव. - महापालिकेचे दवाखाने व रुग्णालये यांच्या परिरक्षणासंबंधातील सूचना/प्रस्ताव- रस्त्यांचे सुभोशीकरण करण्यासंबंधातील सूचना/प्रस्ताव- पदपथांची दुरुस्ती करण्यासंबंधातील सूचना/प्रस्ताव

टॅग्स :मुंबईमुंबई महानगरपालिका