प्रसिद्ध आणि ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू असून, आशा भोसले यांची नात जनाई भोसले हिने प्रकृतीबद्दल माहिती दिली आहे. आशा भोसले यांना दुपारपासूनच अस्वस्थ वाटत होते. त्रास वाढल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
जनाई भोसले हिने एक्सवर पोस्ट करत माहिती दिली की, "माझी आजी, आशा भोसले यांना प्रचंड थकवा आणि छातीत संसर्ग झाल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आम्ही विनंती करतो की, कृपया आमच्या खाजगीपणाचा आदर करावा. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि लवकरच सर्व काही ठीक होईल अशी आम्हाला आशा आहे. त्यांच्या प्रकृतीबद्दल आम्ही तुम्हाला सकारात्मक माहिती देत राहू."
९२ वर्षीय आशा भोसले यांना त्रास जाणवू लागला होत्या. त्यांना कार्डियाक अरेस्ट आल्याचेही सूत्रांनी म्हटले होते. मात्र, आता त्यांच्या कुटुंबीयांकडून आजाराची माहिती देण्यात आली आहे.
ब्रीच कँडी रुग्णालयात अत्यावश्यक वैद्यकीय सेवा विभागात आशा भोसले यांच्यावर उपचार सुरू आहेत. ब्रीच कँडी रुग्णालयाचे डॉ. प्रतीत समदानी यांनीही याला दुजोरा दिला आहे. दरम्यान, आशा भोसले याच्या प्रकृतीबद्दल चौकशी करण्यासाठी कॅबिनेट मंत्री आशिष शेलार ब्रीच कँडी रुग्णालयात पोहोचले आहेत.
आशा भोसले यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली, तेव्हा त्यांची बहीण उषा मंगेशकर या पुण्यात होत्या. त्या तातडीने मुंबईकडे रवाना झाल्या.
Web Summary : Asha Bhosle is hospitalized in Mumbai due to exhaustion and a chest infection. Her granddaughter, Zanai, requests privacy, stating treatment is underway, and they expect a positive recovery. Minister Ashish Shelar visited the hospital.
Web Summary : आशा भोसले थकान और छाती में संक्रमण के कारण मुंबई के एक अस्पताल में भर्ती हैं। उनकी पोती, जनाई ने गोपनीयता का अनुरोध किया है, और कहा कि इलाज चल रहा है, और उन्हें सकारात्मक सुधार की उम्मीद है। मंत्री आशीष शेलार ने अस्पताल का दौरा किया।