विकास म्हणजे काय रे भाऊ?
By Admin | Updated: October 9, 2014 22:41 IST2014-10-09T22:41:53+5:302014-10-09T22:41:53+5:30
देशाच्या स्वातंत्र्याची पासष्टी होऊनही १३ व्या विधानसभेला सामोरे जाताना साऱ्याच राजकीय पक्षांच्या प्रचाराची गाडी आजही वीज, पाणी आणि रस्त्यामध्येच अडकली.

विकास म्हणजे काय रे भाऊ?
सिकंदर अनवारे, दासगांव
देशाच्या स्वातंत्र्याची पासष्टी होऊनही १३ व्या विधानसभेला सामोरे जाताना साऱ्याच राजकीय पक्षांच्या प्रचाराची गाडी आजही वीज, पाणी आणि रस्त्यामध्येच अडकली. त्यामुळे ग्रामीण भागातील मतदार मात्र विकास म्हणजे काय रे भाऊ, असा प्रश्न उमेदवारालाच विचारत आहे.
भारतामध्ये इंग्रजांनी जवळपास ३५0 वर्षे राज्य केले. गुलामगिरीत असतानाही इंग्रजांनी राबविलेल्या अनेक योजना, प्रकल्प आजही चांगल्या अवस्थेत उभे आहेत. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशाचा आणि देशातील नागरिकांचा विकास सुरू झाला. देशामध्ये दळणवळणाच्या साधनांत आमूलाग्र बदल होत गेला. देशातील ८० टक्के जनता खेडेगावात रहाते. ग्रामीण भागातील जनतेच्या खेडेगावांचा विकास झाल्यास देशाचा विकास होईल, असे महात्मा गांधींनी म्हटले आहे. स्वातंत्र्यप्राप्तीला आता ६५ वर्षे उलटून गेली आहेत. तरी भारत देशातील घटनेतील तरतुदीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांपासून लोकसभेपर्यंत मतांच्या आधारे निवडणुका होत आहेत.
ग्रामीण भागातील व्यक्तींचा विकास हा त्यांच्या कृषी, रोजगार, वीज, पाणी अशा प्रकारच्या मूलभूत प्राथमिक मूळ सुविधांवर अवलंबून आहे. याकरिता ग्रामपंचायत, पंचायत समिती, जि. प. ते थेट मंत्रालयापर्यंत विविध योजना आखल्या गेल्या आहेत. मात्र खेडेगावातील परिस्थिती भयानक अशीच आहे.
गावामध्ये होणारे रस्ते, पाणी पुरवठा योजना, वीज पुरवठा या व्यतिरिक्त ग्रामीण भागात वेगळे उपक्रम राबविले गेले नाहीत. रस्ते किंवा इतर योजनांत टक्केवारीमुळे दुसऱ्या वर्षी रस्ता पहावयास मिळत नाही.