Join us  

आंदोलक रेल्वे अॅप्रेंटिस विद्यार्थ्यांच्या नेमक्या काय आहेत मागण्या ? 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2018 9:06 AM

रेल्वे भरतीतल्या अभूतपूर्व गोंधळामुळे अॅप्रेंटिसच्या विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्रा घेत आज दादर-माटुंग्या दरम्यान रेल रोको केला आहे.

मुंबई- रेल्वे भरतीतल्या अभूतपूर्व गोंधळामुळे अॅप्रेंटिसच्या विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्रा घेत आज दादर-माटुंग्या दरम्यान रेल रोको केला आहे. या रेल रोकोमुळे कामावर जाणा-या प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले आहेत. विद्यार्थ्यांनी मध्य रेल्वेवरील माटुंगा ते दादरदरम्यान रेल्वे रुळावर ठिय्या मांडल्यानं एकही लोकल पुढे सरकू शकत नाही. त्यामुळे लोकलसह एक्स्प्रेस गाड्याही खोळंबल्या आहेत. परंतु या अॅप्रेंटिसच्या विद्यार्थ्यांवर हे आंदोलन करण्याची दुर्दैवी वेळ ही रेल्वे प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळेच आली आहे. आधी रेल्वे अप्रेटिंसच्या विद्यार्थ्यांना थेट रेल्वेत सामावून घेतलं जात होतं, पण आता त्यासाठी रेल्वे प्रशासनानं 20 टक्क्यांच्या कोटा आरक्षित केला आहे. तसेच या विद्यार्थ्यांना रेल्वेमध्ये सामावून घेण्यासाठी लेखी परीक्षाही अनिवार्य केली आहे. त्यामुळे बाहेरून येणा-या विद्यार्थ्यांना जास्त प्राधान्य दिलं जात असल्याचा या अॅप्रेंटिसच्या विद्यार्थ्यांचा आरोप आहे. अॅप्रेंटिसच्या विद्यार्थ्यांच्या मागण्या रेल्वे प्रशासनानं मान्य न केल्यास हे आंदोलन तीव्र करण्याचाही इशारा आंदोलक विद्यार्थ्यांनी दिला. विशेष म्हणजे यात अनेक मराठी तरुणांचाही समावेश आहे.काय आहेत रेल्वे अॅप्रेंटिस विद्यार्थ्यांच्या मागण्या ?

  • रेल्वेत अॅप्रेंटिस विद्यार्थ्यांसाठी 20 टक्के असलेला कोटा रद्द करावा
  • रेल्वे अॅक्ट अॅप्रेंटिस परीक्षेत पास झालेल्या विद्यार्थ्यांना रेल्वे सेवेत कायमस्वरूपी सामावून घ्यावे
  • रेल्वे अॅप्रेंटिस उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना जीएम कोट्याअंतर्गत जुन्या नियमानुसार रेल्वेत सामावून घ्यावे, त्याप्रमाणेच भविष्यातही तोच नियम कायम ठेवावा
  • यासंदर्भात महिन्याभरात निर्णय व्हावा, कोणत्याही नियम आणि अटी लागू करू नये
टॅग्स :मध्य रेल्वेआंदोलन