‘मातोश्री’सह शिंदेशाहीचा मान राखलेल्या रमेश म्हात्रेंचे काय?
By Admin | Updated: October 30, 2014 22:41 IST2014-10-30T22:41:21+5:302014-10-30T22:41:21+5:30
ज्येष्ठ नेते- नगरसेवक रमेश म्हात्रेंनी 1 ऑक्टोबरला अचानकपणो निवडणूक रिंगणातून यू टर्न घेतल्याने त्या मतदारसंघातील निवडणूक समीकरणो झपाटय़ाने बदलली.

‘मातोश्री’सह शिंदेशाहीचा मान राखलेल्या रमेश म्हात्रेंचे काय?
डोंबिवली : कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रतून निवडणूक लढतीत शिवसेनेशी बंडखोरी करुन भाजपात आलेल्या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते- नगरसेवक रमेश म्हात्रेंनी 1 ऑक्टोबरला अचानकपणो निवडणूक रिंगणातून यू टर्न घेतल्याने त्या मतदारसंघातील निवडणूक समीकरणो झपाटय़ाने बदलली. मात्र तरीही नाराज असलेल्या म्हात्रेंनी ऐनवेळी तलवार म्यान का केली? त्यांना नेमके कोणते ‘चॉकलेट’ ‘गाजर’ दाखवले अशा शब्दांत शिवसैनिकांमध्येच उलट सुलट चर्चा सुरु आहे. आणि आता निवडणूक निकालांनंतर त्यांना शिंदेशाहीसह मातोश्री वरुन मिळालेल्या आश्वासनांचे काय असा सवाल करत कल्याण डोंबिवलीतील सैनिकांमध्ये चर्चा सुरु आहे.
27 सप्टेंबर रोजी त्यांनी तब्बल 38 वर्षाहून अधिक काळ शिवसेनेशी एकनीष्ठ राहूनही पक्षाने विधानसभेची उमेदवारी विद्यमान आमदार सुभाष भोईर यांना उमेदवारी दिल्याने नाराज झालेल्या रमेश म्हात्रे यांनी भाजपाची साथ धरली होती, भाजपनेही त्यांना कल्याण ग्रामीणसाठी पक्षातर्फे अधिकृत उमेदवारी दिली होती. त्यानूसार म्हात्रे यांनी तीन दिवस प्रचारही करत त्यात आघाडीही घेत विरोधकांना फेस आणला होता.
मात्र, निवडणूक फॉर्मची छाननी होऊन उमेदवारी निश्चित होण्याच्या आधीच जिल्हा संपर्क नेते आमदार एकनाथ शिंदेंसह मातोश्रीवरील पक्षनेतृत्वाने रातोरात म्हात्रे यांचा विचार बदलण्यास त्यांना भाग पाडल्याने राजकीय गोटात तर्क वितर्काना उधाण आले आहे. दोन दिवसांपासून नाराज असल्याने भाजपच्या कंपूत बैठका करणा:या म्हात्रेंवर अन्याय झाल्याने त्यांना कसे पक्षात आणल्याने भारावून गेलेल्या भाजपाला गाफिलपणा भोवला.
म्हात्रे आल्याने येथिल पक्षश्रेष्ठींनी त्यांना ‘कोअर बैठकीत’ क्षणार्धात एबी फॉर्मची निश्चिती केली. एवढेच नव्हे तर कहर म्हणजे ‘डमी’ उमेदवारही दिलेला नव्हता, याचाच पश्चाताप पक्षनेत्यांना अद्यापही होत आहे. भाजपाने तर सीट गमावलीच परंतू म्हात्रेंना दिलेल्या शब्दाचे काय या चर्चेला मात्र आता ऊत आला आहे. (प्रतिनिधी)
शिवसैनिकांनी शांतता-संयम पाळावा
मी शिवसेनेशी एकनिष्ठ असून भाजपाने संधी देऊनही केवळ शिवसेना पक्षहितासाठी मी माझा एबी फॉर्म मिळालेला अर्ज मागे घेतला. त्यावेळी पक्षश्रेष्ठींनी मला काही आश्वासने दिली असून ते त्याची पूर्तता करतील यावर माझा विश्वास आहे. शिवसैनिकांसह माङया समर्थकांनी थोडा धीर-संयम ठेवावा, आपले नेते दिलेला शब्द पाळतात अशी त्यांची ख्याती आहे.
- रमेश म्हात्रे, (शिवसेना नेते, नगरसेवक, कडोंमपा)