पश्चिम रेल्वेचे ‘न्यू इयर गिफ्ट’
By Admin | Updated: December 31, 2014 01:50 IST2014-12-31T01:50:05+5:302014-12-31T01:50:05+5:30
बारा डब्यांसाठी प्लॅटफॉर्मचा विस्तार आणि प्लॅटफॉर्मची उंचीही वाढली जाणार आहे. यासह अन्य सेवासुविधा देण्यावरही भर देण्यात येणार असल्याचे पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आले.

पश्चिम रेल्वेचे ‘न्यू इयर गिफ्ट’
मुंबई : पश्चिम रेल्वेकडून यंदा प्रवाशांना ‘न्यू इयर गिफ्ट’ दिले जाणार आहे. एसी लोकल, बंद दरवाजा लोकल, ५१ सरकते जिन्यासंह, अंधेरी ते गोरेगाव हार्बरचा विस्तार, बारा डब्यांसाठी प्लॅटफॉर्मचा विस्तार आणि प्लॅटफॉर्मची उंचीही वाढली जाणार आहे. यासह अन्य सेवासुविधा देण्यावरही भर देण्यात येणार असल्याचे पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आले.
पश्चिम रेल्वेकडून या वर्षी तिकिट सेवांमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा केली. यासाठी दादर, वांद्रे अंधेरी, बोरीवली, वसई रोडसह अन्य स्थानकांवर पाच आणि दहा रुपयांच्या तिकिटांसाठी स्वतंत्र खिडक्या सुरु केल्या. तसेच २०० एटीव्हीएमही बसवले आहेत. तर रुळ ओलांडणे, अपघात रोखण्यासाठी स्थानकांवरील गर्दी कमी करण्यास तब्बल १०७ पादचारी पुल बांधले. अशा सर्व सोयिसुविधा देतानाच पुढील नविन वर्षात तर न्यू इयर गिफ्ट पश्चिम रेल्वेकडून देण्यात येणार आहे. नविन एसी लोकलचा मुहूर्त हा नविन वर्षातच असून तीन ते चार महिन्यात ही लोकल येणार असल्याचे पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आले. तर आॅटोमॅटीक क्लोज डोअर लोकलही ताफ्यात येणार असून नव्या वर्षात मे किंवा जून महिन्यांपर्यंत ही लोकल येईल. या लोकलसाठी साधारपणे ४ कोटींचा खर्च आला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे तब्बल ५१ सरकते जिने स्थानकांवर बांधण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात आठ आणि नंतरच्या टप्प्यात सुरुवातीला दहा सरकते जिने बांधण्यात येणार आहेत.
अंधेरी ते गोरेगाव असा मार्च किंवा एप्रिलपर्यंत हार्बरचा विस्तार करतानाच बारा डब्यांसाठी प्लॅटफॉर्मचाही विस्तार केला जाणार असल्याचे सांगित आले. महत्त्वाची बाब म्हणजे १८ प्लॅटफॉर्मची उंची नववर्षात वाढविताना आणखी मोठ्या प्रमाणात प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
बुलेट ट्रेन आणि अहमदाबाद कॉरीडोरचीही चर्चा राहणार
च्मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन आणि मुंबई ते अहमदाबाद हायस्पीड कॉरीडोरचीही चर्चा नव्या वर्षात राहिल. भारतीय रेल्वे आणि जपान इंटरनॅशनल को. आॅपरेशनच्या सहकार्याने या बुलेट ट्रेनचा अहवाल मे किंवा जून २0१५ पर्यंत सादर केला जाणार आहे. त्याचप्रमाणे मुंबई-अहमदाबाद हायस्पीड कॉरीडोरसाठी ताशी १३0 किमीपर्यंतची मंजुरी रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.