Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘परे’चा फुकट्या प्रवाशांना दणका! ४३.५४ कोटी वसूल; मुंबई विभागात ११.७१ कोटींची वसुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 14:13 IST

एप्रिल ते मे या दोन महिन्यांतील कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: पश्चिम रेल्वेने एप्रिल ते मे या दोन महिन्यांत तिकीट तपासणीच्या माध्यमातून ४३.५४ कोटी रुपयांचा दंड वसूल केला. यामध्ये मुंबई विभागातील ११.७१ कोटी रुपयांच्या दंडाचा समावेश आहे.

पश्चिम रेल्वे लोकल, मेल-एक्सप्रेस तसेच सुट्टी निमित्त सुरू केलेल्या विशेष गाड्यांमध्ये सतत तिकीट तपासणी मोहिमा राबवत आहे. वरिष्ठ व्यावसायिक अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली मे महिन्यात तीन लाख फुकट्या प्रवाशांकडून २१.६५ कोटी रुपये वसूल करण्यात आले. यामध्ये नोंद न केलेल्या सामानाच्या प्रकरणांचाही समावेश आहे. उपनगरीय विभागात १.०४ लाखांहून अधिक प्रकरणांत ५.७१ कोटी रुपयांचा दंड वसूल केला. एप्रिल ते मेदरम्यान १० हजार ३०० हून अधिक प्रवाशांना दंड करण्यात आला आहे.

टॅग्स :पश्चिम रेल्वेतिकिटमुंबई लोकल