Join us

Western Railway Update: पश्चिम रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत; लोकल 20 ते 25 मिनिटे उशिराने

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2022 09:19 IST

कामावर जाण्याची वेळ असतानाच हा बिघाड झाल्याने प्रवासी त्रस्त झाले आहेत.

गोरेगाव स्टेशनजवळ ओव्हरहेड वायरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने पश्चिम रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळे लोकल २० ते २५ मिनिटे उशिराने धावत आहेत. 

कामावर जाण्याची वेळ असतानाच हा बिघाड झाल्याने प्रवासी त्रस्त झाले आहेत. फास्ट लोकल देखील धिम्या गतीने जात असून हा बिघाड दुरुस्त करण्याचे काम सुरु आहे. दोन दिवसांपूर्वी मध्य रेल्वेवर नेरळ रेल्वेस्थानकावर मालगाडी बंद पडल्याने मध्य रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पश्चिम रेल्वेवर वाहतूक विस्कळीत होण्याचे प्रकार फार कमी घडतात. 

टॅग्स :पश्चिम रेल्वे