Join us  

पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गोरेगावजवळ तांत्रिक बिघाड

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2019 8:14 AM

पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल गाड्या 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत आहेत. 

मुंबईपश्चिम रेल्वेवरील वाहतूक तांत्रिक बिघाड झाल्यामुळे उशिराने सुरू आहे. गोरेगाव स्थानकात तांत्रिक बिघाड झाल्याने वाहतुकीवर परिणाम झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, हा बिघाड दुरुस्त करण्यात आला आहे. मात्र, 10 ते 15 मिनिटे उशिराने लोकल धावत आहेत. यामुळे पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी साडे सातच्या सुमारास गोरेगाव स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला. यामुळे पश्चिम  रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली.  दरम्यान, पश्चिम रेल्वे प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत सिग्नल यंत्रणेत बिघाड दुरुस्त केला. मात्र, अद्याप पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल गाड्या 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत आहेत. 

दरम्यान, गेल्या आठवड्यात मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. मध्य रेल्वेच्या कोपर स्थानकाजवळ रेल्वे रुळाला तडा गेल्याने वाहतूक उशिराने सुरु होती. डोंबिवलीहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या लोकल सेवेवर परिणाम झाला होता. मध्य रेल्वेची ही वाहतूक विस्कळीत झाल्याने कल्याण, डोंबिवली रेल्वे स्थानकांमध्ये सध्या प्रचंड गर्दी झाली होती. 

टॅग्स :मुंबई लोकलमुंबईमुंबई ट्रेन अपडेटपश्चिम रेल्वे