ओव्हरहेड वायरमुळे पश्चिम रेल्वे प्रवाशांना दुहेरी फटका

By Admin | Updated: July 10, 2014 02:23 IST2014-07-10T02:23:04+5:302014-07-10T02:23:04+5:30

ओव्हरहेड वायर तुटल्याची घटना घडलेली असतानाच रात्री बोरीवली स्थानकाजवळही ओव्हरहेड वायर तुटल्याची घटना घडली.

Western Railway passengers double blow due to overhead wire | ओव्हरहेड वायरमुळे पश्चिम रेल्वे प्रवाशांना दुहेरी फटका

ओव्हरहेड वायरमुळे पश्चिम रेल्वे प्रवाशांना दुहेरी फटका

मुंबई : दादर स्थानकाजवळ दुपारच्या सुमारास ओव्हरहेड वायर तुटल्याची घटना घडलेली असतानाच रात्री बोरीवली स्थानकाजवळही ओव्हरहेड  वायर तुटल्याची घटना घडली. या घटनेमुळे रात्री कामावरुन घरी परतणा:या प्रवाशांचे मात्र हाल झाले. 
दुपारी बाराच्या सुमारास दादर स्थानकाजवळ डाऊन धीम्या मार्गावर ओव्हरहेड वायर तुटल्याची घटना घडली. त्यामुळे या मार्गावरील लोकल जलद मार्गावरुन वळवण्यात आली होती. पंचवीस मिनिटे झालेल्या या खोळंब्याने प्रवाशांचे मात्र हाल झाले. ही घटना पश्चिम रेल्वे प्रवाशांसाठी ताजी असतानाच रात्री दहाच्या सुमारास कांदिवलीच्या दिशेने असलेल्या बोरीवली यार्डामधील ओव्हरहेड वायर तुटली.  या घटनेची माहीती मिळताच रेल्वेकडून त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. तोर्पयत विरारच्या दिशेने जाणा:या लोकल गाडय़ा मंदावल्या. धीम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर वळवण्यात आल्या. त्यामुळे धीम्या आणि जलद लोकलचा वेग खूपच मंदावला. या दोन्ही मार्गावरील लोकल तब्बल 25 मिनिटे उशिराने धावू लागल्या. रात्री साडे अकराच्या सुमारास ओव्हरहेड वायरमधील दुरुस्ती ठिक करण्यात आल्यानंतर लोकल सेवा पुर्ववत करण्यात आली. 

 

Web Title: Western Railway passengers double blow due to overhead wire