तांत्रिक बिघाडामुळे पश्चिम रेल्वे विस्कळीत

By Admin | Updated: March 13, 2016 04:33 IST2016-03-13T04:33:49+5:302016-03-13T04:33:49+5:30

शनिवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास तांत्रिक बिघाडामुळे पश्चिम रेल्वेच्या धीम्या मार्गावरील लोकल संथगतीने धावत होत्या

Western Railway disrupts due to technical difficulties | तांत्रिक बिघाडामुळे पश्चिम रेल्वे विस्कळीत

तांत्रिक बिघाडामुळे पश्चिम रेल्वे विस्कळीत

मुंबई : शनिवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास तांत्रिक बिघाडामुळे पश्चिम रेल्वेच्या धीम्या मार्गावरील लोकल संथगतीने धावत होत्या. सांताक्रुझ येथे सिग्नलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने अप आणि डाउन अशा दोन्ही दिशेकडील लोकल मंदावल्याने प्रवाशांचे हाल झाले. पावणेचार वाजण्याच्या सुमारास बिघाड दुरुस्त झाल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सांताक्रुझ येथील धीम्या मार्गावर चर्चगेट दिशेकडील एका सिग्नलमध्ये बिघाड झाला. परिणामी, चर्चगेट आणि बोरीवली दिशेकडील दोन्ही
बाजूची वाहतूक विस्कळीत झाली होती. (प्रतिनिधी)

Web Title: Western Railway disrupts due to technical difficulties