Join us

सिग्नल यंत्रणेत बिघाडाचा पश्चिम रेल्वेला फटका, वाहतूक 20 ते 25 मिनिटे उशिराने 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2018 09:11 IST

सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने पश्चिम रेल्वेची अप आणि डाऊन मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.

मुंबई - सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने पश्चिम रेल्वेची अप आणि डाऊन मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. सांताक्रूझ आणि विलेपार्लेदरम्यान सिग्न यंत्रणेत बिघाड झाल्याचा फटका पश्चिम रेल्वेला बसला असून, त्यामुळे दोन्ही मार्गांवरची वाहतूक 20 ते 25 मिनिटे उशिराने सुरू आहे. त्यामुळे ऐन सकाळच्या कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. सिग्नल यंत्रणा दुरुस्त करून वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 

टॅग्स :मुंबई लोकलपश्चिम रेल्वेमुंबई