- कुलदीप घायवटमुंबई : भारतीय रेल्वेच्या १६ झोनच्या स्वच्छतेच्या यादीत पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वे पाच क्रमांकांनी पिछाडीवर गेली आहे. ‘स्वच्छ रेल, स्वच्छ भारत २०१९’च्या झोनल रँकिंगमध्ये ही आकडेवारी नमूद करण्यात आली आहे. मागील वर्षी भारतीय रेल्वेच्या १६ झोनच्या यादीत पश्चिम रेल्वे पाचव्या तर मध्य रेल्वे आठव्या क्रमांकावर होती. मात्र या वर्षी पश्चिम रेल्वेची १० व्या आणि मध्य रेल्वेची १३ व्या क्रमांकावर घसरण झाली आहे.सर्वेक्षणानुसार पश्चिम रेल्वेचा यंदा १० वा क्रमांक आला. या झोनला १ हजारपैकी ६६८.२८८ गुण मिळाले आहेत. तर, मध्य रेल्वेचा यंदा १३ वा क्रमांक आला. या झोनला १ हजारपैकी ६४९.००६ गुण मिळाले. उत्तर पश्चिम रेल्वे झोन प्रथम क्रमांकावर असून मागील वर्षीचा क्रमांक त्यांनी यंदा राखून ठेवला आहे. या झोनला १ हजारपैकी ८४८.७६४ गुण मिळाले आहेत. शेवटच्या क्रमांकावर उत्तर मध्य रेल्वे झोन आहे. त्यांनीदेखील मागील वर्षीचा क्रमांक कायम राखून ठेवला आहे. या झोनला १ हजारपैकी ६३१.४३१ गुण मिळाले. ही गुण संख्या सर्वांत कमी आहे.दुसऱ्या क्रमांकावर दक्षिण पूर्व मध्य रेल्वे असून त्यांना ८०१.३०१ गुण मिळाले. पूर्व मध्य रेल्वेला ७.३८.०६६ गुण, दक्षिण मध्य रेल्वेला ७३२.३१०, दक्षिण पश्चिम रेल्वेला ७२३.५४९, उत्तर रेल्वेला ७१६.५१५, ईशान्य सीमा रेल्वेला ६८४.२७४, पश्चिम मध्य रेल्वेला ६७६.६७०, पूर्व कोस्ट रेल्वेला ६७५.८४०, पश्चिम रेल्वेला ६६८.२८८, उत्तर पूर्व रेल्वेला ६६७.५४७, दक्षिण रेल्वेला ६६४.७२०, मध्य रेल्वेला ६४९.००६, पूर्व रेल्वेला ६४४.८२२, दक्षिण पूर्व रेल्वेला ६३६.५८६, तर दक्षिण मध्य रेल्वेला ६३१.४३१ गुण मिळाले आहेत.
पश्चिम, मध्य रेल्वेच्या स्वच्छतेची गाडी रुळावरून घसरली; पाच क्रमांकांनी पिछाडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2019 06:32 IST