भीमज्योतींचे चवदार तळ्यात स्वागत

By Admin | Updated: April 14, 2015 22:42 IST2015-04-14T22:42:04+5:302015-04-14T22:42:04+5:30

महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२४ व्या जयंतीनिमित्त महाडमध्ये भिमसागर उसळला

Welcome to the tamarind pool of bhimjyots | भीमज्योतींचे चवदार तळ्यात स्वागत

भीमज्योतींचे चवदार तळ्यात स्वागत

महाड : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२४ व्या जयंतीनिमित्त महाडमध्ये भिमसागर उसळला. ऐतिहासिक चवदार तळे तसेच क्रांतिस्तंभ येथील डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी सोमवारी रात्रीपासूनच गर्दी होती. राज्यभरातून विविध ठिकाणाहून आलेल्या भीमज्योतींचे चवदार तळे येथे स्वागत करण्यात आले. महाडचे आ. भरत गोगावले, माजी आ. माणिक जगताप, नगराध्यक्षा भारती सकपाळ, प्रांताधिकारी सुषमा सातपुते, तहसीलदार संदीप कदम आदींनी डॉ. आंबेडकरांना अभिवादन केले.
महाड क्रांतिभूमी संघटनेतर्फे शहरातून डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी भीमसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते.

भव्य मिरवणूक
४आगरदांडा : मुरुड तालुक्यातील बौद्ध समाज सेवा संघ केंद्रीय समिती स्थानिक तालुका समितीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी वाजतगाजत मिरवणूक काढून बाबासाहेबांची भव्य प्रतिमा, बॅनर घेऊन बाजारपेठेतून फिरवण्यात आली.

४खालापूर : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२४ वी जयंतीनिमित्त तालुक्यात ठिकठिकाणी आदारांजली वाहण्यात आली. खोपोली शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास सकाळी नगराध्यक्ष दत्तात्रय म्हसूरकर, उपनगरध्यक्ष रमेश जाधव, विरोधी पक्ष नेते तुकाराम साबळे, मुख्याधिकारी दीपक सावंत यांच्यासह नगरसेवक मोहन औसरमल, सभापती निकिता मोरे, पोलीस निरीक्षक जयसिंह तांबे आदींनी अभिवादन केले.

जयंतीनिमित्त अन्नदान
४तळोजा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीनिमित्त पनवेल, कळंबोली, तळोजा परिसरात मोठा उत्साह जाणवत होता. शहरातील भीमसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित डॉ. आंबेडकरांना आदरांजली वाहिली. खारघर सेक्टर-३६ येथेही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ३ हजार लोकांनी अन्नदानाचा लाभ घेतला. डॉ. आंबेडकरांवरील गौरवपर गाण्यांनी भीमप्रेमींना नवचैतन्य दिले.

वाहनांची रॅली
४नागोठणे : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२४ व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. येथील बौद्धजन पंचायत समितीच्या शाखा - ३ च्यावतीने घेतलेल्या जयंती सोहळ्याचा शुभारंभ रमाईनगरात सकाळी पूजापाठाने झाला. त्यानंतर रमाईनगर ते शिवाजी चौकमार्गे ग्रामपंचायत कार्यालय व तेथून पुढे गांधी चौकमार्गे केएमजी विभागातून रमाईनगर अशी वाहनांची रॅली काढली. या मिरवणुकीदरम्यान ग्रामपंचायत कार्यालयात थांबून मान्यवरांच्या उपस्थितीत आदरांजली वाहिली.

४शहरातील बौद्ध महासभेसह, आरपीआय, भारिप, स्वारिप, बसपा, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, मनसे पक्षांचे राजकीय नेते, कार्यकर्ते यांनीही अभिवादन केले. संपूर्ण शहरातील भीमसैनिकांनी मोटारसायकल रॅली काढली. शहराच्या विविध शासकीय आणि खाजगी आस्थापनात बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन केले. संपूर्ण दिवसभर शहरात जयंतीचा उत्सव दिसून येत होता. चौक, वावोशी, डोनवत येथेही जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

Web Title: Welcome to the tamarind pool of bhimjyots

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.