रतन टाटा यांची तैलचित्रांना दाद

By Admin | Updated: March 25, 2015 01:00 IST2015-03-25T01:00:38+5:302015-03-25T01:00:38+5:30

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे आयोजित ‘सामाजिक जागृती तैलचित्र’ प्रदर्शनाला जगप्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनी दाद दिली आहे.

Welcome to Ratan Tata's oil paintings | रतन टाटा यांची तैलचित्रांना दाद

रतन टाटा यांची तैलचित्रांना दाद

मुंबई : डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे आयोजित ‘सामाजिक जागृती तैलचित्र’ प्रदर्शनाला जगप्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनी दाद दिली आहे. या तैलचित्र प्रदर्शनाला भेट दिल्यानंतर हे प्रदर्शन खूपच प्रभावशाली असून, नानासाहेबांच्या कार्याचे चित्रण सुंदररीत्या मांडण्यात आले आहे. देशाच्या नागरिकांना योग्य मार्ग दाखवत त्यांना घडवण्याचे काम नि:स्वार्थीपणे डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान करीत आहे, असे मत रतन टाटा यांनी व्यक्त केले.
डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे वृक्षारोपण, नि:शुल्क आरोग्य निदान, मूकबधिर विद्यार्थ्यांना श्रवणयंत्रांचे वाटप, शैक्षणिक साहित्याचे वाटप, प्रवासी निवारे आणि ग्रामस्वच्छता अभियान असे विविध उपक्रम राबविले जातात. धर्माधिकारी कुटुंबाच्या याच नि:स्वार्थी कार्याचा आढावा ‘सामाजिक जागृती तैलचित्रां’तून साकारण्यात आला आहे. हे प्रदर्शन ३१ मार्चपर्यंत सर्वांसाठी खुले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Welcome to Ratan Tata's oil paintings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.