दिवा-वसई नव्या गाडीचे स्वागत
By Admin | Updated: December 15, 2014 22:57 IST2014-12-15T22:57:27+5:302014-12-15T22:57:27+5:30
दिवा - वसई रोड, बोईसरदरम्यान मध्य रेल्वेने इलेक्ट्रीकवर चालणारी आधुनिक गाडी सुरू केली असून तिचे वसईकर नागरिकांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले.

दिवा-वसई नव्या गाडीचे स्वागत
वसई : दिवा - वसई रोड, बोईसरदरम्यान मध्य रेल्वेने इलेक्ट्रीकवर चालणारी आधुनिक गाडी सुरू केली असून तिचे वसईकर नागरिकांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले. सायंकाळी ६ च्या सुमारास वसई रोड येथे ही गाडी आली असता प्रवाशांनी एकच जल्लोष केला.
वसई-दिवादरम्यान गेली अनेक वर्षे रेल्वे असून यंदा रेल्वेने या मार्गावर डीईएमयू गाडी सुरू करण्याचा निर्णय घेतला होता.
रविवारी पहिली गाडी या मार्गावर सुरू झाली. संध्या. ४ वा. दिवा स्थानकातून निघालेली ही गाडी संध्या. ६ वा. वसई रोड स्थानकात आली. या वेळी वसईकर प्रवाशांनी तिचे जोरदार स्वागत केले. या गाडीच्या मोटरमनला हार घालून व पेढे वाटून प्रवाशांनी आनंद व्यक्त केला.
या नवीन गाडीमुळे रेल्वेसेवेची क्षमता अधिक प्रमाणात वाढेल, असा विश्वास प्रवाशांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)