अभिलाषा म्हात्रेचे जल्लोषात स्वागत

By Admin | Updated: October 7, 2014 01:40 IST2014-10-07T01:40:18+5:302014-10-07T01:40:18+5:30

आशियाई क्रीडा स्पर्धेत कबड्डीमध्ये देशाला सुवर्णपदक मिळवून देण्यामध्ये महत्त्वाची कामगिरी करणा-या अभिलाषा म्हात्रे हिचे नवी मुंबईत रविवारी जल्लोषात स्वागत करण्यात आले

Welcome to Abhilasha Mhatre's Sankalok | अभिलाषा म्हात्रेचे जल्लोषात स्वागत

अभिलाषा म्हात्रेचे जल्लोषात स्वागत

नवी मुंबई : आशियाई क्रीडा स्पर्धेत कबड्डीमध्ये देशाला सुवर्णपदक मिळवून देण्यामध्ये महत्त्वाची कामगिरी करणा-या  अभिलाषा म्हात्रे हिचे नवी मुंबईत रविवारी जल्लोषात स्वागत करण्यात आले.नेरूळमध्ये तिच्या स्वागतासाठी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
कबड्डीमध्ये सुवर्णपदक मिळविणाऱ्या भारतीय संघामध्ये नवी मुंबईमधील अभिलाषा म्हात्रे हिचाही समावेश होता. इराण विरुद्ध झालेल्या अंतिम सामन्यात विजय मिळवून देण्यात तिचाही मोलाचा वाटा होता. सुवर्णपदक मिळविल्यानंतर अभिलाषा आज मायदेशी परत आली. सीवूड दारावे मित्र मंडळ, आंबेडकर विचार मंच, सीवूड ज्येष्ठ नागरिक संघाच्यावतीने रॅली काढून अभिलाषाचा सत्कार करण्यात आला. तिच्या कामगिरीचा अभिमान वाटत असल्याची प्रतिक्रिया उपस्थितांनी दिली. देशासाठी सुवर्णपदक मिळविण्यासाठी योगदान देता आले त्याचा अभिमान वाटत असल्याची प्रतिक्रिया तिने यावेळी व्यक्त केली आहे. यावेळी नगरसेवक संदीप सुतार, माजी नगरसेविका सलुजा सुतार, संतोष जाधव, सुभाष सावंत, मंदार बानावली व इतर मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Welcome to Abhilasha Mhatre's Sankalok

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.