रेल्वे प्रवाशांसाठी साप्ताहिक विशेष गाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:08 IST2021-02-16T04:08:16+5:302021-02-16T04:08:16+5:30

मुंबई : रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर ते धनबाद दरम्यान साप्ताहिक विशेष गाडी चालवण्यात येईल. ...

Weekly special train for train passengers | रेल्वे प्रवाशांसाठी साप्ताहिक विशेष गाडी

रेल्वे प्रवाशांसाठी साप्ताहिक विशेष गाडी

मुंबई : रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर ते धनबाद दरम्यान साप्ताहिक विशेष गाडी चालवण्यात येईल. १९ फेब्रुवारीपासून ती श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर येथून दर शुक्रवारी ०४.३५ वाजता सुटेल. धनबाद येथून विशेष गाडी २२ फेब्रुवारीपासून दर सोमवारी १०.२० वाजता सुटेल.

.......................................

मुंबई ते आग्रा विशेष गाड्या

मुंबई : रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी मुंबई व आग्रा छावणी / हबीबगंज दरम्यान विशेष गाड्या चालवणार आहे. मुंबई- आग्रा कॅन्टोन्मेंट साप्ताहिक विशेष गाडी १९ फेब्रुवारीपासून लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दर शुक्रवारी १६.२५ वाजता सुटेल. आग्रा कॅन्टोन्मेंट येथून विशेष गाडी २० फेब्रुवारीपासून दर शनिवारी १९.४५ वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी १६.१५ वाजता पोहोचेल.

.............................

नागपूर, मडगावदरम्यान वातानुकूलित विशेष गाड्या

मुंबई : प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने नागपूर आणि मडगावदरम्यान संपूर्णत: वातानुकूलित साप्ताहिक विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. वातानुकूलित साप्ताहिक विशेष गाडी २० फेब्रुवारी ते २७ मार्चपर्यंत दर शनिवारी नागपूरहून १५.५० वाजता सुटेल आणि मडगावला दुसऱ्या दिवशी १६.४० वाजता पोहोचेल. वातानुकूलित साप्ताहिक विशेषगाडी २१ फेब्रुवारी ते २८ मार्चपर्यंत मडगाव येथून दर रविवारी १९.४० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी २०.३० वाजता नागपूरला पोहोचेल.

.................

Web Title: Weekly special train for train passengers