आम्ही गप्प बसणार नाही!
By Admin | Updated: October 30, 2014 02:01 IST2014-10-30T02:01:57+5:302014-10-30T02:01:57+5:30
कष्टक:यांना लिखित स्वरूपात आश्वासने देऊन भारतीय जनता पार्टी सत्तेवर आली आहे. त्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप असणा:यांना सत्तेत वाटा दिल्यास ती जनतेशी घोर प्रतारणा होईल.

आम्ही गप्प बसणार नाही!
अतुल कुलकर्णी - मुंबई
कष्टक:यांना लिखित स्वरूपात आश्वासने देऊन भारतीय जनता पार्टी सत्तेवर आली आहे. त्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप असणा:यांना सत्तेत वाटा दिल्यास ती जनतेशी घोर प्रतारणा होईल. जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण झाली नाहीत तर आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी दिला आहे. तर मूळ संपत्ती जाहीर करून संबंधितांनी मंत्रिपदाची शपथ घ्यावी, असे आवाहन युक्रांद चळवळीचे प्रणोते कुमार सप्तर्षी यांनी केले आहे.
‘हवे आहेत भ्रष्टाचाराचे आरोप नसणारे मंत्री!’ असे म्हणत ‘लोकमत’ने सुरू केलेल्या जनजागरावर अनेक ज्येष्ठ सामाजिक कार्यकत्र्यानीही आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. निवडणुकीत उमेदवारी देताना ज्यांना जवळ केले गेले, ते पाहता हे सरकार भ्रष्टाचाराच्याविरोधात खरोखरीच लढेल का, ही शंका मनात आहेच. हे लोकदेखील तोडपाणी करणार असतील तर जो धडा कष्टक:यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला दिला तोच या सरकारलादेखील देईल, असे ‘लोकमत’शी बोलताना आढाव यांनी सांगितले. लोक आता भ्रष्ट कारभाराला कंटाळलेले आहेत. त्यांची सहनशीलता संपलेली आहे. त्यामुळे जनतेचा भ्रमनिरास होईल असे वागू नका, असेही आढाव म्हणाले.
मंत्री होताना आधी संपत्ती जाहीर करा. मूळ संपत्तीत विक्रमी वाढ होऊ देऊ नका. बबनराव पाचपुतेंना मीच तिकीट दिले होते. त्या वेळी ते दोन पत्र्यांच्या खोलीत राहायचे. आता त्यांचा अडीच एकरात बंगला झाला. कारखाने झाले, राहणी बदलली, हे कसे झाले? याचे उत्तर शोधण्यासाठी कोण्या ज्योतिषाची गरज नाही, असे कुमार सप्तर्षी म्हणाल़े सरकार कोणाचेही असो, मंत्रलयात दलाल तेच ते दिसतात. दलालमुक्त मंत्री हवे आहेत. त्यांनी जनतेला कमी लेखू नये, त्यांना महाराष्ट्राची जाण हवी, अशा अपेक्षाही सप्तर्षी यांनी व्यक्त केल्या.
बुधवारी मंत्रिमंडळातील काही नावे जाहीर होतील, असे वाटत होते. मात्र काही आमदारांवर मागचा कारभार पाहता अनेक सवाल उपस्थित झाले होते.
सत्ताधारी पक्षांसोबत सहयोगी पक्षासारखे वागणा:यांना मंत्री तर करावे लागेल, पण खाती कोणती द्यायची यावरूनही दिवसभर मंथन सुरू होते. छोटे मंत्रिमंडळ तयार करुन जातीचे, विभागाचे समीकरण सांभाळताना प्रतिमा देखील जपण्याचा प्रयत्न करण्यासाठी आटापिटा चालू असल्याचे सूत्रंचे म्हणणो आहे.