...असा साजरा करतो आम्ही ‘थर्टी फर्स्ट’

By Admin | Updated: December 29, 2014 22:59 IST2014-12-29T22:59:57+5:302014-12-29T22:59:57+5:30

प्रत्येक जण आयुष्यात सगळ््यात जास्त मजा करतो ती कॉलेजमध्ये. या दिवसातील मजा प्रत्येकाच्या मनात खोल कुठेतरी दडलेली असते.

... we celebrate 'Thirty First' | ...असा साजरा करतो आम्ही ‘थर्टी फर्स्ट’

...असा साजरा करतो आम्ही ‘थर्टी फर्स्ट’

जान्हवी मोर्ये
प्रत्येक जण आयुष्यात सगळ््यात जास्त मजा करतो ती कॉलेजमध्ये. या दिवसातील मजा प्रत्येकाच्या मनात खोल कुठेतरी दडलेली असते. कॉलेजमध्ये खास धमाल असते ती कॉलेज डेज मध्ये. कॉलेज डेजमध्ये केलेली धम्माल, मजा-मस्ती यांच्या आठवणी प्रत्येक कॉलेजियन्सच्या मनात रूंजी घालत असतानाच सध्या कॉलेजमध्ये ख्रिसमस व्हॅकेशन सुरू झाली आहे. ख्रिसमस व्हॅकेशनमुळे थर्टी फर्स्टचा प्लनिंग करताना कॉलेजला ब्रेक मारावा लागणार नसल्याने यंगस्टार्सचाआनंद द्विगुणित झाला आहे. नववर्ष सेलिब्रेशनचे वेगवेगळे बेत आखले जात आहे. नवे वर्ष नवा उत्साह कमविण्यासाठी प्रेरणादायी ठरला पाहिजे. नववर्षांचे सेलिब्रेशन एकमेकांना आनंद देणारेच असले पाहिजे. नववर्षांचे स्वागत धुमधडाक्यात करा; पण धुमाकूळ आवरा असे मत अनेक कॉलेजियन्सचे आहे. सर्व यंगस्टार्सचा थर्टी फर्स्ट सेलिब्रशनासाठीच आता काऊंडटाऊन सुरू झाला आहे.

इंग्रज भारत सोडून गेले. तरी त्यांचे गॅग्रेरीयन कॅलेंडर आज जगद्मान्य आहे. त्याच गॅग्रेरियन कॅलेंडरनुसार नवीन वर्षाची सुरूवात १ जानेवारीला होते. नवीन वर्षापेक्षाही थर्टी फर्स्टचे महत्त्व जास्त असते. मात्र, अलीकडे हा ट्रेंड बदलतोय. थर्टी फर्स्टच्या रात्री केवळ झिंगून नशेत नववर्षाचे स्वागत न करता नवीन पिढी न्यू इअरचे स्वागत कशाप्रकारे करते? त्यांना काय वाटते? नवीन वर्षाचा त्यांचा काय संकल्प असणार आहे? काय कल्पना आहेत त्यांच्या? हे जाणून घेण्यासाठी ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील तरूणाईशी संवाद साधला...

एसवाय बीकॉमला असलेल्या वैभव शिर्के याने सांगितले की, हा थर्टी फर्स्ट मी कुटुंबियांसोबत सेलिब्रेट करणार. यंदाचा थर्टी फर्स्ट साजरा करण्यात मी वेगळेपणा जपण्याचा प्रयत्न करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत हे अभियान सुरू करून देशाला सुंदर बनविण्याचा उपक्रम हाती घेतला. स्वच्छ भारत अभियानाला अनुसरून दिवाळीत फटाके फोडले नाहीत. त्याचप्रमाणे थर्टी फर्स्टचा आनंद लुटताना कचरा होणार नाही याची काळजी घेणार आहे. नववर्षांची सुरूवात करताना चांगला संक ल्प जोपासला गेला पाहिजे. तोच उद्देश फटाके न फोडण्यामागे आहे. मोदींच्या स्वच्छता अभियानाकडे वळलो आहे. हे अभियान तरूणांनी पुढे नेण्याचा संकल्प करायला हवा असे मला वाटते. यापूर्वी मी सुध्दा असे काही केले नव्हते. ते आता करणार आहे. खाद्यपदार्थ घरच्या घरी तयार करून थर्टी फर्स्टचा आनंद लुटणार आहे. त्याला देशी फनची जोड देणार आहे.

बीएमएसच्या फर्स्ट इअरला असलेली भक्ती भिलारे हिने सांगितले की, थर्टी फर्स्ट साजरा करण्यावर आपला समाज वारेमाप पैसा खर्च करतो. मात्र आपल्या देशात एक उपेक्षित भारतही आहे. त्या भारतातील आपल्या उपेक्षित बांधवांना थर्टी फर्स्टचा आनंद साजरा करता यावा यासाठी आम्ही व आमच्या घरची मंडळी उपेक्षितांना काही गोडधोड देतो. हा संस्कार मला माझ्या वयाच्या दहाव्या वर्षापासून घरातून मिळाला आहे. हिंंंदू नववर्ष हे पाडव्याला असते. त्यावेळी गुढी उभारून नववर्षाचे स्वागत करतो. त्यामुळे थर्टी फर्स्ट आणि गुढीपाडवा यांच्यातील सेलिबे्रशन हे टोटली वेगळे असते. हा वेगळेपणा जपण्याचा प्रयत्न मी करते. सेलीब्रेशनची सरमिसळ अजून तरी झालेली मला वाटत नाही.

कृतिका परब हिच्या मते थर्टी फर्स्ट कसा साजरा करायचा याचे प्लॅनिंग अद्याप केले नसले तरी इमारतीच्या टेरेसवर आणि घराबाहेर जाऊन थर्टी फर्स्टचा आनंद घेण्याची मज्जा काही औरच असते. सध्या कॉलेजला ख्रिसमस व्हॅकेशन असल्याने व्हॅकेशन पिरियडचा फायदा घेत अलिबागची ट्रीप प्लॅन केली आहे. वर्षाचा शेवट गोड करून नवीन वर्षाची सुरूवात तितक्यात दमाने करण्याचा त्यामागचा हेतू आहे. याशिवाय बाबांच्या कंपनीतील मित्रमंडळीची पार्टी असते. त्यात सहभागी होतो. किंवा घराच्या टेरेसवर पार्टीची भट्टी जमते. टेरीस पार्टीचा बेत नसेल तर आमचे गोव्याला एक घर आहे. गोव्याच्या थर्टी फर्स्टचा जल्लोष काही अलगच असतो. गोवन्स कंपनीबरोबर न्यू इयर फेस्ट साजरा केला जातो. तिथेही मज्जा असते. असे अनेक आॅप्शन माझ्यापुढे आहेत. त्यातला एक निवडून थर्टी फर्स्टची मज्जा लुटणार आहेत.

‘झिंगल बेल... झिंगल बेल’ अशा कॅरलसह ख्रिसमस पार्टी एन्जॉय केल्यावर व्हॉट्सअ‍ॅपवर चर्चा सुरू झाली ती थर्टी फर्स्टच्या प्लॅनिंगची. थर्टी फर्स्टच्या व्हेन्यू, मेन्यू, ड्रेस कोडपासून पार्टीची थीम काय असणार या विषयांवर अनेक ग्रुप्समध्ये चर्चा रंगल्या होत्या. पार्टीचे डेस्टिनेशन आऊट आॅफ स्टेशन असेल तर तिथे कसे जायचे यावरही अनेकांमध्ये चर्चा सुरूच आहे. नवीन वर्षाची सुरूवात जंगी झाली की वर्ष कसे एकदम फट्टे जाते, असा विश्वास असणारी तरूणाई थर्टी फर्स्ट पार्टी प्लॅनच्या बरोबरीनेच नवीन वर्षात काय करायचे याचाही विचार करते आहे. २०१४ मध्ये केलेले रिझोल्यूशन किती पूर्ण केले, किती रिझोल्यूशन तर लक्षात राहिलेच नाही, यावरून एकमेकांची मस्करी केली जात आहे. पण असे होऊनही हार न मानता तरूणाई नवीन वर्षासाठी नवीन रिझोल्यूशन करत आहे. त्यातच रिझोल्यूशन किती वर्षे करूनही पूर्णच होत नाही, अशी इमेज भाव खाऊन जात आहे. या सगळ््या पार्टी मूडमध्ये अंतरगी कविता येत असून त्याचा कवी ओळखा असे आव्हान दिले जात आहे...

कॉलेजच्या कट्ट्यावरची धम्माल, ‘ती’ कॉलेजमध्ये कधी येईल यासाठी तासनतास गेटकडे डोळे लावून बसणं, कॉलेजमधल्या ‘मामा’सोबतची आपली दोस्ती, मित्रांबरोबर बंक केलेली लेक्चर्स, त्यासाठी प्रोफेसरांना दिलेली खोटी कारणं, मित्रांनीही केलेली प्रॉक्सीची मदत... असे मौज आणि मस्तीने भरलेले ते कॉलेजचे क्षण... या आणि अशा तुमच्या धम्माल गोष्टी शेअर करण्यासाठी ‘लोकमत’ने स्पेशली तुमच्यासाठी आणलाय हक्काचा प्लॅटफॉर्म... पाठवा तुमच्या हटके आठवणी ’ङ्म‘ें३ूेंस्र४२@ॅें्र’.ूङ्मे या ई-मेल आयडीवर.

 

Web Title: ... we celebrate 'Thirty First'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.