Join us

We are Thankful... अंबानींच्या घरासमोरची स्फोटकांनी भरलेली कार शोधणाऱ्या पोलिसांचे रिलायन्सकडून आभार

By पूनम अपराज | Updated: February 26, 2021 19:42 IST

Vehicle With Explosives Found Near Mukesh Ambani's House In Mumbai : या घातपाताच्या अयशस्वी कटानंतर अंबानी कुटुंबियांनी प्रतिक्रिया देत मुंबई पोलिसांचे आभार मानले आहेत.

ठळक मुद्देमुकेश अंबानी यांच्या मालकीच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने एक पत्रक जारी केलं आहे.

रिलायन्स उद्योग समूहाचे मालक आणि प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतील अँटेलिया या निवासस्थानाजवळ गुरुवारी स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ कार सापडल्यानं एकच खळबळ माजली होती. या घटनेनंतर अंबानी यांच्या घराबाहेरील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे या प्रकरणाचा गुन्हे शाखा आणि NIA समांतर तपास करत आहे. या घातपाताच्या अयशस्वी कटानंतर अंबानी कुटुंबियांनी प्रतिक्रिया देत मुंबईपोलिसांचे आभार मानले आहेत.मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने एक पत्रक जारी केलं आहे. त्यामध्ये त्यांनी मुंबई पोलिसांचे आभार व्यक्त केले आहेत. 'मुंबई पोलिसांनी तातडीने आणि जलद गतीने निर्णय घेत केलेल्या कारवाईबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. आम्हाला विश्वास आहे की, या प्रकरणामध्ये पोलीस लवकरच वेगाने त्यांचा तपास पूर्ण करतील,' असं रिलायन्स इंटस्ट्रीजने जारी केलेल्या पत्रकात नमूद केले आहे.

 

 

Video : मुंबईत खळबळ! मुकेश अंबानींच्या बंगल्यासमोर सापडली जिलेटीनने भरलेली कार 

 

काल उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या कंबाला हिल परिसरातील घऱाजवळ स्फोटक साहित्याने भरलेली एक स्कॉर्पिओ गाडी आढळल्यानंतर खळबळ उडाली होती. याप्रकरणी गावदेवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 

टॅग्स :पोलिसमुंबईरिलायन्समुकेश अंबानी