आम्ही अफझल खानाच्या फौजेतील नाही !
By Admin | Updated: October 27, 2014 01:03 IST2014-10-27T01:03:49+5:302014-10-27T01:03:49+5:30
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या उपस्थित सत्कार झाला, याचा अर्थ आम्ही अफझल खानाच्या फौजेतले नाही हे सिद्ध झाले आहे,

आम्ही अफझल खानाच्या फौजेतील नाही !
मुंबई : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या उपस्थित सत्कार झाला, याचा अर्थ आम्ही अफझल खानाच्या फौजेतले नाही हे सिद्ध झाले आहे, अशा शब्दांत भाजपा नेते विनोद तावडे यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे. रविवारी पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी वयाची ७७ वर्षे आणि संगीत क्षेत्रातील ६० वर्षे पूर्ण केल्यानिमित्त विलेपार्ले येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
या कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचनादीदी यांना बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते चौथा हृदयनाथ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. दरम्यान, तावडे यांचाही सत्कार करण्यात आला. या वेळी तावडे म्हणाले, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते सत्कार झाला म्हणजे आम्ही अफझल खानाच्या फौजेतील नाहीत, हे सिद्ध झाले आहे.
याशिवाय मतांच्या रूपात जनतेनेही ते दाखवून दिले आहे. परिणामी यापुढे महाराष्ट्रात फक्त विकासाचे राजकारण होईल.
याआधी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान दिल्लीहून अफझल खानाच्या फौजा चालून आल्या असल्याचे वक्तव्य केले होते. (प्रतिनिधी)