मत्स्यशेतीतून गवसला स्वावलंबी जीवनाचा मार्ग

By Admin | Updated: May 30, 2014 00:34 IST2014-05-30T00:34:33+5:302014-05-30T00:34:33+5:30

समुद्रातील मत्स्यव्यवसायाबरोबरच खारवट जमिनीत गोड्या पाण्यातील मत्स्यव्यवसाय अलिबाग व पेण या परिसरात मोठ्या प्रमाणात होत असून येथील ग्रामस्थांचा तो एक महत्वाचा कुटीरोद्योग आहे

The way of self-supporting life through aquaculture | मत्स्यशेतीतून गवसला स्वावलंबी जीवनाचा मार्ग

मत्स्यशेतीतून गवसला स्वावलंबी जीवनाचा मार्ग

अलिबाग : समुद्रातील मत्स्यव्यवसायाबरोबरच खारवट जमिनीत गोड्या पाण्यातील मत्स्यव्यवसाय अलिबाग व पेण या परिसरात मोठ्या प्रमाणात होत असून येथील ग्रामस्थांचा तो एक महत्वाचा कुटीरोद्योग आहे. या परिसरात गोड्या पाण्यातील मत्स्यशेतीमध्ये प्रामुख्याने कटला, रोह, तिलापिया या माशांच्या जातीबरोबरच जिताडा हा मासा अतिशय चविष्ठ असून खवय्यांची त्यास मोठी मागणी असते. अलिबाग आणि पेण परिसरात गोड्या पाण्यातील मत्स्यशेतीला नैसर्गीकरित्या मोठा वाव असून खारेपाट जमिनीत गोड्या पाण्यातील मत्स्यव्यवसायामध्ये येथील शेतकरी गुंतला आहे. या दोन तालुक्यांत दोन हजाराच्या आसपास लहान मोठे गोड्या पाण्याच्या मत्स्यशेतीचे तलाव आहेत. अलिबाग तालुक्यांतील एकट्या शहाबाज गावात साठ तळी आज आहेत. शहाबाजचे मत्स्य शेतकरी नीलेश सदानंद पाटील यांनीही आपल्या परंपरागत भात शेतीला पर्याय म्हणून पाच एकर क्षेत्रात मोठी तीन आणि लहान दोन अशी पाच तळी निर्माण करुन खारवट जमिनीत गोड्या पाण्यातील मत्स्यशेतीचा नाविन्यपूर्ण उपक्र म यशस्वीपणे करु न स्वावलंबी जीवनाचा नवा मार्ग स्विकारला आहे. शहाबाजमधील या साठ तलावात जिताडा, रोह, कटला, तिलापिया या माशांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. शहाबाजचे प्रगतीशिल मत्स्यशेतकरी नीलेश पाटील म्हणाले, वडिलोपार्जीत पाच एकर शेतीमध्ये आम्ही परंपरागत भात शेती करीत होतो. भातशेतीतील उत्पनावर घरगाडा चालविणे तसे अडचणीचे व्हायचे. मात्र २००० मध्ये मत्स्यव्यवसाय विभागातून गोड्या पाण्यातील मत्स्यशेतीला अर्थसहाय्य मिळत असल्याचे समजताच, मत्स्यव्यवसाय विकास अधिका-याकडून या योजनेची सविस्तर माहिती घेऊन त्यानुसार गोड्या पाण्यातील मत्स्यशेती करण्याचा निर्णय घेतला. २००० साली माझ्या पाच एकर शेतीमध्ये दिड एकराचे एक अशी तीन मोठी तळी आणि पाच गुंठ्यांचे एक अशी दोन तळी तयार करण्यास मला मत्स्यव्यवसाय विभागाकडून अर्थसहाय्य मिळाले. आणि मत्स्यशेतीचा नवा पर्याय स्विकारला. यावेळी तीन फुट खोलीचे शंभर मीटर लांबीचे आणि साठ मीटर रु ंदीचे दिड एकरामध्ये एक अशी तीन मोठी तळी घेतली तर पाच फुट खोलीचे वीस मीटर लांबीचे, वीस मीटर रु ंदीचे पाच गुंठे क्षेत्रात दोन तळी घेतली. यामध्ये शासनाच्या मत्स्यव्यवसाय विभागाकडून खोपोलीच्या शासकीय मत्स्यबीज केंद्रातून प्रशिक्षणाबरोबरच मत्स्यबीजही उपलब्ध केले आणि या परिसरातील सर्वाधिक मागणी असणार्‍या जिताडा माशाचे स्थानिक परिसरात खाडीमध्ये बीज घेऊन मत्स्यशेतीला सुरूवात केली. मत्स्यशेतीचे शास्त्रशुध्द प्रशिक्षण घेऊन मत्स्यव्यवसाय विभागाच्या सहकार्याने मत्स्यशेतीस सुरूवात केली. पहिल्या वर्षी जून-जूलै मध्ये जिताडाचे मत्स्यबीज तळ्यामध्ये सोडले. मत्स्यव्यवसाय विभागाच्या मार्गदर्शनानूसार ही मत्स्यशेती केली. नीलेश पाटील यांना त्यांची आई शकुंतला व पत्नी सुजाता यांची मोलाची मदत होत असून सारं कुटुंबच या मत्स्यशेतीत अहोरात्र राबत आहेत. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: The way of self-supporting life through aquaculture