गिरणी कामगारांच्या घरांचा मार्ग अडला
By Admin | Updated: January 18, 2015 01:00 IST2015-01-18T01:00:14+5:302015-01-18T01:00:14+5:30
गिरणी कामगारांसाठी एमएमआरडीएच्या घरांचा मार्ग रखडला आहे. कारण या घरांच्या सोडतीचा मुहूर्त अजून संबंधित विभागाला मिळालेला नाही.

गिरणी कामगारांच्या घरांचा मार्ग अडला
मुंबई : गिरणी कामगारांसाठी एमएमआरडीएच्या घरांचा मार्ग रखडला आहे. कारण या घरांच्या सोडतीचा मुहूर्त अजून संबंधित विभागाला मिळालेला नाही.
सर्व गिरणी कामगारांचे मुंबईत घरे देऊन पुनर्वसन करणे शक्य नाही, म्हणून राज्य सरकारने २० फेब्रुवारी २०१४ रोजी अध्यादेश काढून एमएमआरडीएची ५० टक्के घरे देण्याचे मान्य केले होते. एमएमआरडीएच्या या प्रकल्पातील २२ हजार घरे बांधून तयार झाली आहेत. याबाबतच्या अटी व शर्ती ठरविण्याचे अधिकार नगरविकास खात्याला आहेत. मात्र नगरविकास खाते याबाबत ठोस निर्णय घेत नसल्याने गिरणी कामगारांच्या घरांच्या सोडतीचा मार्ग मोकळा होत नसल्याचे चित्र आहे.
गिरणी कामगार कृती संघटनेचे नेते प्रवीण घाग यांनी दिलेल्या माहितीनुसार, सेंच्युरी मिल, प्रकाश कॉटन मिल, भारत टेक्सटाइल मिल, पोद्दार प्रोसेस, स्वान ज्युबिली, रुबी व वेस्टर्न इंडियाच्या जमिनींवर घरांचे बांधकाम सुरू आहे. या गिरण्यांतील कामगारांच्या घरांसाठीची सोडत लवकरात लवकर काढावी, असे संघटनेचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)
गिरणी कामगार संघर्ष समिती, राष्ट्रीय मिल मजदूर संघ, महाराष्ट्र गिरणी कामगार युनियन, रयत राज कामगार संघटना, सेंच्युरी मिल कामगार एकता मंच या कामगार संघटनांच्या वतीने विविध मागण्यांसाठी२० जानेवारी रोजी दुपारी २ वाजता चर्चगेट रेल्वे स्थानकाहून मंत्रालयावर मोर्चा काढला जाणार आहे.