रानमेवा परतण्याच्या मार्गावर

By Admin | Updated: May 29, 2014 23:51 IST2014-05-29T23:51:42+5:302014-05-29T23:51:42+5:30

आदिवासी महिला कशीवली, जांभूळमाथा, पाथर्डी, झाप, आदि खेडोपाड्यातून पोटाच्या खळगीसाठी जंगलांत, रानावनात भटकंती करून जांभळे गोळा करून, टोपल्या डोक्यावर घेऊन जांभूळ विक्रीसाठी बाजारात येत होते.

On the way back to Rannimava | रानमेवा परतण्याच्या मार्गावर

रानमेवा परतण्याच्या मार्गावर

जव्हार : गेल्यावर्षी उशिराने का होईना जांभळे बाजारात आली होती, यंदाही जव्हारच्या बाजारात उशिराने जांभळे दाखल झाली आहेत, मात्र पावसाला सुरुवात होण्याची चिन्हे असल्याने व एकंदरच ढगाळ वातावरण असल्याने बाजारात रानमेवा दाखल होण्यापूर्वीच तो परतण्याची चिन्हे दिसून येत आहे. जव्हारच्या बाजारात शेकडो आदिवासी महिला कशीवली, जांभूळमाथा, पाथर्डी, झाप, आदि खेडोपाड्यातून पोटाच्या खळगीसाठी जंगलांत, रानावनात भटकंती करून जांभळे गोळा करून, टोपल्या डोक्यावर घेऊन जांभूळ विक्रीसाठी बाजारात येत होते. हवामान बदलामुळे यावर्षी जांभळांची आवक घटल्याने एप्रिल महिन्याच्या सुरवातीला मिळणारी जांभळे मे महिन्याच्या शेवटी बाजारात विक्रीकरीता कशीवली क्र. १ व २ येथील एका आदिवासी महिलेने जांभळे गांधी चौक येथे विक्रीकरीता आणली होती. अवघ्या १० मिनिटात दोन्ही टोकर्‍या खव्वैयांनी संपवल्या. शहरात व इतरत्र ठिकाणी बाजारात जांभळे किलोने विकली जातात, मात्र येथील आदिवासींना वाटा पद्धतीने जांभळे विकावी लागतात. मोठा वाटा १०/- तर छोटा वाटा ५/- प्रमाणे विक्री केली जाते. या पारंपरिक पध्द्तीने जांभळे विक्री होते. औषधी गुणधर्म असलेले जांभूळ मधुमेह या रोगावर शारीरिक दृष्ट्या गुणकारी आहे. (वार्ताहर)

Web Title: On the way back to Rannimava