मुंबईत बुधवारी पाणीकपात

By Admin | Updated: January 18, 2015 01:38 IST2015-01-18T01:38:57+5:302015-01-18T01:38:57+5:30

जलवाहिनीवर गोरेगावमधील आरे वसाहत येथे सहा ठिकाणी गळती बंद करण्याचे काम २० जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता हाती घेण्यात येणार आहे.

Waterquake in Mumbai on Wednesday | मुंबईत बुधवारी पाणीकपात

मुंबईत बुधवारी पाणीकपात

मुंबई : वेरावली टेकडी जलाशयाला पाणीपुरवठा करणाऱ्या १२०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीवर गोरेगावमधील आरे वसाहत येथे सहा ठिकाणी गळती बंद करण्याचे काम २० जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता हाती घेण्यात येणार आहे. हे काम २१ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याने या काळात पश्चिम उपनगरात पाणीकपात करण्यात येणार आहे.
जोगेश्वरी पूर्वेकडील बांद्रेकर वाडी, आजगावकर प्लॉट, सुभाषनगर, वांद्रे प्लॉट, हरीनगर, शंकर वाडी, हेमा इंडस्ट्रीयल एरिया, हिंदू फ्रेंड्स सोसायटी मार्ग, गुंफा मार्ग, जोगेश्वरी (पूर्व), पंप हाऊसजवळ मालपा डोंगरी १,२,३ प्रकाशवाडी, गोविंदवाडी, गुंदवली हिल, पारसी पंचायत रस्ता, आंबेवाडी, मोगरा, जुना नागरदास मार्ग, जोगेश्वरी पश्चिमेकडील बेहरामबाग, विकासनगर, क्रांतीनगर, शक्तीनगर, स्काऊट कॅम्प रस्ता, आनंदनगर, पाटलीपुत्र, काजूपाडा, गणेशनगर, हरियाणा वस्ती, सुलताना बाग, प्रथमेश संकुल, सहकार मार्ग, यादवनगर, अक्सा मस्जीद मार्ग या परिसरात २० टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)

 

Web Title: Waterquake in Mumbai on Wednesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.