पाणपोई... मुंबईच्या इतिहासातील मैलाचे दगड
By Admin | Updated: July 26, 2016 00:00 IST2016-07-26T00:00:00+5:302016-07-26T00:00:00+5:30

पाणपोई... मुंबईच्या इतिहासातील मैलाचे दगड
मुंबई शहराच्या दक्षिण भागात सर्व प्रशासकीय आणि मोठ्या कंपन्यांची कार्यालये असल्यामुळे लोकांना येथे दररोज कामासाठी यावे लागे. तहान भागविण्यासाठी शहराच्या विविध भागांमध्ये पाणपोयांची स्थापना करण्यात येत असे. पारशी जैन मारवाडी व्यापारी आपल्या घरातील व्यक्तींच्या स्मरणार्थ देणगी देऊन लोकांना पाणी मिळण्याची सोय करत. मात्र आता या पाणपोयांची अवस्था अत्यंत वाईट झाली असून त्यांचे पुनरुज्जीवन करण्याची वेळ आली आहे. पाणपोईंची सर्व छायाचित्रे दत्ता खेडेकर यांनी टिपली आहेत.