निवडणुकीच्या तोंडावर पाणी तापले
By Admin | Updated: September 17, 2014 22:26 IST2014-09-17T22:26:01+5:302014-09-17T22:26:01+5:30
निवडणुकीची आचारसंहिता लागताच अंबरनाथमध्ये राजकीय वातावरण तापण्याऐवजी पाण्याचे राजकारण तापले आहे.

निवडणुकीच्या तोंडावर पाणी तापले
पंकज पाटील ल्ल अंबरनाथ
निवडणुकीची आचारसंहिता लागताच अंबरनाथमध्ये राजकीय वातावरण तापण्याऐवजी पाण्याचे राजकारण तापले आहे. पाणी वितरण व्यवस्थेत राजकीय हस्तक्षेप करून काही भागांतील नागरिकांना पाण्यापासून वंचित ठेवण्याचे काम करण्यात येत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे वर्चस्व असलेल्या ठिकाणी हा घोळ होत असल्याने येथील नागरिक संताप व्यक्त करत आहेत.
अंबरनाथ नगर परिषद क्षेत्रत पाणीपुरवठय़ाची जबाबदारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणावर आहे. बॅरेज धरणातून 39 दशलक्ष लीटर्स, चिखलोली धरणातून 6 आणि एमआयडीसीकडून 5 असा एकूण 5क् दशलक्ष लीटर्स पाणीपुरवठा शहराला करण्यात येत आहे. शहराच्या तुलनेने तो मुबलक असतानाही महाराष्ट्र जीवन प्राधिकरण वितरण व्यवस्थेत घोळ घालत असल्याने अनेक भागांत कमी दाबाने तर काही भागांत आठवडय़ातून तीन ते चार दिवसच पाणीपुरवठा केला जात आहे. यात अनेक भागांत राजकीय पुढारीच हस्तक्षेप करून पाणी आपल्याकडे वळवण्याचा प्रय} करीत आहेत. शहरात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे वर्चस्व असलेल्या भागात शिवसेनेचे बडे नेते अधिका:यांवर आणि कर्मचा:यांवर दबाब टाकून या भागात कमी प्रमाणात पाणी सोडण्यास भाग पाडत आहेत, असा आरोप काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष आणि अंबरनाथ बांधकाम सभापती प्रदीप पाटील यांनी केला आहे. एवढेच नव्हे तर शिवसेनेचे नगरसेवक असलेल्या प्रभागात नव्या जलवाहिन्या टाकण्यासाठी अधिका:यांवर आणि ठेकेदारावर दबाबतंत्रचा वापर करण्यात येत आहे. त्यामुळेच शिवसेनेच्या प्रभागात जलवाहिन्यांचे काम झाले आहे. आघाडीच्या प्रभागात जलवाहिन्यांचे काम करण्यासाठी संबंधित नगरसेवकांना संघर्ष करावा लागत आहे.
अंबरनाथ पश्चिम भागातील कोहजगाव, कमलाकरनगर, चिंचपाडा, फुलेनगर, वांद्रेपाडा, कैलासनगर, शास्त्रीनगर, जावसई गाव, डिफेन्स कॉलनी आणि उलन चाळ भागांत मोठय़ा प्रमाणात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या भागांत काही नागरिकांना तीन ते चार दिवस पाणीपुरवठाच झालेला नाही. या प्रकरणाची तक्रार केल्यास जलकुंभात पाणीच नसल्याचे उत्तर अधिकारी देत आहेत. मात्र, जलकुंभात पाणी का नाही, याचे उत्तर देण्याचे अधिकारी टाळत आहेत. जो तक्रार करेल, त्याला उद्या पाणी येईल, एवढेच सांगण्यात येत आहे. तसेच उद्या पाणी देण्याचे आश्वासन देऊन हे प्रकरण शांत करण्याचा प्रय} अधिकारी करत आहेत.