Join us
Daily Top 2Weekly Top 5

जलबोगद्याच्या कामामुळे पाणीपुरवठा ३० तास बंद; शहर, उपनगरातील अनेक भागांना ५, ६ मे रोजी फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2026 09:53 IST

या कामादरम्यान शहर विभागातील ‘एफ उत्तर’, ‘एफ दक्षिण’ आणि पूर्व उपनगरातील ‘एल’, ‘एम पूर्व’, ‘एम पश्चिम’ व ‘एन’ विभागात काही ठिकाणी पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

मुंबई - महापालिकेकडून अमर महल ते वडाळा आणि परळ, तसेच ट्रॉम्बे-तुर्भे जलाशयापर्यंतचा जलबोगदा कार्यान्वित करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे मंगळवार, ५ मे रोजी सकाळी १० वाजल्यापासून ६ मे रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत मुंबईतील अनेक भागांत पाणीपुरवठा ३० तासांसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे.

या कामादरम्यान शहर विभागातील ‘एफ उत्तर’, ‘एफ दक्षिण’ आणि पूर्व उपनगरातील ‘एल’, ‘एम पूर्व’, ‘एम पश्चिम’ व ‘एन’ विभागात काही ठिकाणी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर, काही ठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. जलबोगद्याच्या कामासाठी तुर्भे उच्चस्तरीय आणि निम्नस्तरीय जलाशयाची जलवाहिनी या काळात तात्पुरती बंद ठेवली जाणार आहे.  त्यामुळे एकूणच संबंधित विभागातील नागरिकांनी या कालावधीत पाण्याचा आवश्यक साठा करावा. पाणी काटकसरीने वापरून सहकार्य करावे, असे आवाहन पालिकेने केले आहे. दरम्यान, पाण्याअभावी नागरिकांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे.

बुधवार, ६ मे - पूर्णपणे पाणी बंद राहणारा परिसर

एफ उत्तर : प्रतीक्षानगर, शास्त्रीनगर, वडाळा ट्रक टर्मिनस, न्यू कफ परेड.एफ दक्षिण : परळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, साने गुरुजी मार्ग, जेरबाई वाडिया मार्ग.एल विभाग : कुर्ला पूर्व, टिळकनगर,  म्हाडा वसाहत, चुनाभट्टी.

मंगळवार आणि बुधवार (दोन्ही दिवस पाणी बंद) 

एन विभाग : घाटकोपर पूर्व आणि पश्चिम, विद्याविहार, पंतनगर, विक्रोळी गाव, कामा गल्ली, रमाबाई नगर.एम पूर्व : मानखुर्द, शिवाजीनगर, गोवंडी, देवनार गाव, बैगणवाडी, रफिक नगर.

कमी दाबाने पाणीपुरवठा होणारे भाग

एम पश्चिम : चेंबूर, माहुल गाव, भक्ती पार्क, सिंधी सोसायटी (बुधवारी कमी दाबाने).एफ उत्तर : शिव पूर्व आणि पश्चिम.

English
हिंदी सारांश
Web Title : Mumbai Water Supply Disrupted for 30 Hours Due to Tunnel Work

Web Summary : Mumbai faces a 30-hour water cut on May 5-6 due to vital tunnel work. Several areas will have no or low-pressure water. Residents are urged to store water and use it sparingly as municipal work temporarily shuts water lines.
टॅग्स :मुंबई