गोरेगावात पाणी पुरवठ्यात अपहार; प्रवीण गोरेगावकर यांचे उपोषण

By Admin | Updated: August 15, 2014 02:04 IST2014-08-15T02:04:49+5:302014-08-15T02:04:49+5:30

माणगाव तालुक्यातील गोरेगाव ग्रामपंचायतीअंतर्गत २५ लाखांचा अपहार केल्याप्रकरणी गोरेगाव ग्रामपंचायत सदस्य प्रवीण गोरेगावकर स्वातंत्र्यदिनी सकाळी उपोषणाला बसणार आहेत.

Water supply in Goregaon; Praveen Goregaonkar's fasting | गोरेगावात पाणी पुरवठ्यात अपहार; प्रवीण गोरेगावकर यांचे उपोषण

गोरेगावात पाणी पुरवठ्यात अपहार; प्रवीण गोरेगावकर यांचे उपोषण

गोरेगाव : माणगाव तालुक्यातील गोरेगाव ग्रामपंचायतीअंतर्गत २५ लाखांचा अपहार केल्याप्रकरणी गोरेगाव ग्रामपंचायत सदस्य प्रवीण गोरेगावकर स्वातंत्र्यदिनी सकाळी उपोषणाला बसणार आहेत.
ग्रामपंचायतीमध्ये स्थापित ग्राम, आरोग्य, पोषण, पाणीपुरवठा व स्वच्छता समिती यांनी नियमबाह्य कारभार करून सुमारे २५ लाख रु पये बेकायदेशीरपणे ठेकेदाराला दिलेले आहेत. याबाबतीत प्रवीण गोरेगावकरने माहिती अधिकारअंतर्गत ग्रामपंचायत आणि पाणीपुरवठा समिती यांच्याकडे माहिती मागवलेली होती. मात्र ती दिली गेली नाही.
पाणीपुरवठा समितीचे दफ्तर ताब्यात घेण्याविषयी जि.प. च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार केला असल्याचे गोरेगावकर यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे. मात्र याबाबतीत कारवाई संथ गतीने होत आहे. या कृत्याचा निषेध म्हणून ते उद्यापासून उपोषणाला बसणार आहेत.

Web Title: Water supply in Goregaon; Praveen Goregaonkar's fasting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.