भिवंडीत टँकरने पाणीपुरवठा

By Admin | Updated: August 13, 2014 00:16 IST2014-08-13T00:16:32+5:302014-08-13T00:16:32+5:30

भिवंडी महानगरपालिका क्षेत्रांतील गायत्रीनगर भागात जलवाहिनी,कुपनलीका व पाण्याची टाकी बांधलेली असताना देखील मुसळधार पावसांत टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

Water supply by furious tankers | भिवंडीत टँकरने पाणीपुरवठा

भिवंडीत टँकरने पाणीपुरवठा

भिवंडी : भिवंडी महानगरपालिका क्षेत्रांतील गायत्रीनगर भागात जलवाहिनी,कुपनलीका व पाण्याची टाकी बांधलेली असताना देखील मुसळधार पावसांत टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. मनपाच्या पाणीपुरवठा विभागात चाललेल्या या गलथान कारभाराविरोधात गायत्रीनगर मधील नागरिक संताप व्यक्त करीत असून आयुक्तांनी या विभागातील कामचुकार अधिकारी व कर्मचाऱ्याान्त्त निलंबीत करण्याची मागणी त्यांनी केली आहे़
भिवंडी महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने गायत्रीनगर ते रामनगर परिसरांतील नागरिकांसाठी पाण्याची टाकी बांधून दहा वर्षापेक्षा जास्त कालावधी लोटला आहे. परंतु याटाकीत अद्याप पिण्याचे गेलेले नाही. शांतीनगर मधून आलेल्या जलवाहिन्यांवर अनधिकृतपणे नळजोडणी केलेल्यांवर भरारी पथकाने आजतागायत कारवाई न केल्याने मोठ्या संख्येने पाण्याची चोरी होत आहे.
तर जलवाहिन्यांवर उघड्या स्थितीतील जोडणीतून काही ठिकाणी पिण्याचे पाणी वाहत असते तर पाणी गेल्यानंतर सांडपाणी,शौचाचे पाणी व पावसाचे पाणी या जलवाहिनीत घुसते. त्यामुळे हे पाणी घरगुती वापराकरीता अथवा पिण्यायोग्य राहत नाही. तसेच कुपनलिकेतील
पाणी ज्यांनी वीजेची मोटार लावली त्यास पाणी मिळते इतरांना ते मिळत नाही.
काहींनी मोटारी लावून पाणी विक्रीचा धंदा या भागात सुरू केला आहे. या सर्व घटनांबाबत कोणतीही ठोस कारवाई न करता स्टेम व मुंबई महानगरपालिकेकडून विकत घेतलेले पिण्याचे पाणी पुन्हा टॅन्करव्दारे वाहून गायत्रीनगरच्या रहिवाश्यांना पावसाळ्यात देखील पुरवित आहे. टॅन्करव्दारे पाणीपुरवठा करीत असताना आजतागायत टॅन्करखाली चिरडून लहानमुलांसहीत ७ जणांचा मृत्यू झाला. (प्रतिनिधी)

Web Title: Water supply by furious tankers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.