Join us  

चार दिवसांत तलावांमध्ये महिन्याभराचा जलसाठा, पाण्याची चिंता मिटण्याची चिन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 2:49 AM

सलग कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने मुंबईकरांची दैना उडवली तरी पाण्याची चिंता मिटण्याची चिन्हे आहेत. गेल्या चार दिवसांत धो धो कोसळत पावसाने तब्बल महिन्याभराचा जलसाठा वाढविला आहे.

मुंबई - सलग कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने मुंबईकरांची दैना उडवली तरी पाण्याची चिंता मिटण्याची चिन्हे आहेत. गेल्या चार दिवसांत धो धो कोसळत पावसाने तब्बल महिन्याभराचा जलसाठा वाढविला आहे. मुंबईला दररोज ३,७५० दशलक्ष लीटर्स पाणीपुरवठा होतो. वर्षभर हा पाणीपुरवठा सुरळीत राहण्यासाठी आॅक्टोबर महिन्यात तलावांमध्ये १४ लाख ४७ हजार दशलक्ष लीटर जलसाठा असणे आवश्यक असते. जून महिन्यात पावसाचा जोर कमी असल्याने मुंबईला पाणीपुरवठा करणाºया तलावांमध्ये जेमतेम १८ ते २० टक्केच जलसाठा शिल्लक होता. मात्र जुलैच्या पहिल्याच आठवड्यापासून जोरदार हजेरी लावत पावसाने ही कसर भरून काढली आहे. गेल्या शनिवारी तलावांमध्ये साडेचार लाख दशलक्ष लीटर जलसाठा होता. सलग कोसळणाºया मुसळधार पावसामुळे तुळशी तलाव भरून वाहू लागला. तसेच तलावांमध्ये जलसाठा एक लाख १४ हजार दशलक्ष लीटरने वाढला आहे. म्हणजेच ३० दिवसांचा जलसाठा या चार दिवसांमध्ये तलाव क्षेत्रात जमा झाला आहे.

टॅग्स :धरणमुंबईपाणी