जिल्ह्यात पाणीटंचाई !
By Admin | Updated: February 24, 2015 00:43 IST2015-02-24T00:43:40+5:302015-02-24T00:43:40+5:30
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या बृहन्मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील गावपाड्यांची पाणीटंचाई आता नित्याची झाली आहे

जिल्ह्यात पाणीटंचाई !
सुरेश लोखंडे, ठाणे
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या बृहन्मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील गावपाड्यांची पाणीटंचाई आता नित्याची झाली आहे. काही गावपाड्यांमध्ये ती आत्ताच डोके वर काढू लागली आहे. शासनाच्या दप्तरी अद्याप एकाही गावाची नोंद नसली तरी सुमारे ५८० गावपाड्यांमध्ये तीव्र पाणीटंचाई उद्भवण्याची दाट शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.
मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात ही पाणीटंचाई जाणवण्याची शक्यता आहे. यामध्ये १७८ गावे व ३९५ आदिवासीपाड्यांचा समावेश आहे. मागील वर्षी जुलैपर्यंत सुमारे २०० गावापाड्यांच्या ग्रामस्थांनी ती अनुभवली. यामध्ये ५३ गावांसह १४७ पाड्यांचा समावेश होता. या गावांना ३७ टँकरद्वारे पाणीपुरवठा झाल्याचा दावा प्रशासनाद्वारे करण्यात आला होता. तत्कालीन सर्वाधिक टंचाई शहापूर तालुक्यातील ९० गावपाड्यांनी भोगली आहे. या वर्षाच्या संभाव्य टंचाईतदेखील सर्वाधिक शहापूरच्या २६१ गावपाड्यांचा समावेश आहे.